Maruti Dzire 2024 खरेदी करावी की नवीन Amaze येण्याची वाट पाहावी?
भारतात सध्या अनेक कार्स लाँच होत. यात इलेक्ट्रिक आणि इंधनावर चालणाऱ्या कार्सचा समावेश आहे. कार खरेदीदार सुद्धा या नवीन कार्सना भरघोस प्रतिसाद देत आहेत. नुकतेच देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी होंडाने मारुती डिझायरचे अपडेटेड व्हर्जन भारतीय मार्केटमध्ये लाँच केले होते.
भारतात काही अशा सुद्धा कार्स आहेत ज्यांनी भारतीय ग्राहकांच्या मनात घर केले आहे. मारुती सुझुकीची डिझायर कार ही त्यापैकीच एक आहे. दरमहिन्याला या कारचे कितीतरी युनिट्स मार्केटमध्ये विकले जातात. ग्राहकांचा हाच विश्वास पाहून कंपनीने काही दिवसांपूर्वीच डिझायरचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले आहे.
Bajaj सीएनजी बाईकनंतर, ‘या’ पर्यावरणपुरक प्रकारातील बाईक लवकरच लॉंच करणार!
डिझायरच्या अपडेटेड व्हर्जनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख 79 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. जर आपण टॉप व्हेरियंटच्या किंमतीबद्दल बोललो तर ते 10 लाख 14 हजार रुपयांपर्यंत जाते. तुम्ही मारुती सुझुकी डिझायर एकूण 4 व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकता.
मारुती डिझायर नवीन डिझाइन आणि नवीनतम फीचर्ससह आले आहे. या कारच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूस एलईडी लाइट्स वापरण्यात आले आहेत. कारला 15 इंच ड्युअल टोन अलॉय व्हील देण्यात आले आहेत. कारचा आकार पूर्वीपेक्षा अधिक चांगला ठेवण्यात आहे. कारमधील 9-इंचाची टचस्क्रीन आता मोठी झाली आहे आणि स्टेअरिंग देखील पुन्हा डिझाइन केले आहे. डायल स्विफ्टसारखे असले तरी डिजिटल नसतानाही ते स्पष्ट आहेत. डॅशबोर्ड स्वच्छ आणि डिझाइनमध्ये सोपा आहे. यासोबतच स्टोरेजही बऱ्यापैकी आहे.
नवीन मारुती डिझायरची सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे यावेळी कारमध्ये सनरूफ फीचर आणि HD डिस्प्लेसह 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे, जे मोठ्या सेडानमध्ये 360 डिग्री कॅमेरा फीचर्स आढळत नाही. यासोबतच कारमध्ये क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, क्रूझ कंट्रोल आणि रियर एसी व्हेंट्स यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. जागेबद्दल बोलायचे झाले तर ती पूर्वीसारखीच आहे परंतु जुन्या डिझायरपेक्षा सीट अधिक आरामदायक आहेत.
Nissan Magnite चा परदेशातही डंका ; एका महिन्यात ‘इतक्या’ युनिट्सची झाली निर्यात
Honda Amaze बद्दल बोलायचे तर, ही कार अजून लाँच झालेली नाही, मात्र या कारचा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर दाखवतो की नवीन अमेझ ADAS सह येऊ शकते. यासोबतच नवीन डिझायरमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. नवीन Honda Amaze मध्ये फीचर्स आणि बदललेले इंटिरिअर मिळणार आहे. ही कार सिटी आणि एलिव्हेटपासून प्रेरित असेल. जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तुम्ही Honda Amaze लाँच होण्याची वाट पाहू शकता.