(फोटो सौजन्य-AI एआय)
गिक्सर आणि गिक्सर एसएफला नवीन Metallic Oort Gray + Pearl Blaze Orange ड्युअल-टोन रंग मिळाला आहे. दुसरीकडे, गिक्सर 250, गिक्सर एसएफ 250 आणि गिक्सर एसएफ 250 FFV यांना Glass Sparkle Black + Metallic Oort Gray ही नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. गिक्सर एसएफ 250 FFVसाठी Glass Sparkle Black हा सिंगल-टोन पर्यायही उपलब्ध झाला आहे.
Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही
किंमतींचा विचार केला तर गिक्सरची सुरुवातीची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ₹1.37 लाख आहे. गिक्सर एसएफची किंमत ₹1.41 लाख, गिक्सर 250 ची ₹1.85 लाख आणि गिक्सर एसएफ 250 ची ₹1.93 लाख आहे. तर फ्लेक्स-फ्युएल गिक्सर एसएफ 250 FFV ची किंमत ₹1.98 लाख ठेवण्यात आली आहे.
ग्राहकांसाठी कंपनीने काही फायदेही जाहीर केले आहेत. गिक्सर आणि गिक्सर एसएफवर ₹1,500 पर्यंत, तर गिक्सर 250 आणि गिक्सर एसएफ 250 वर ₹3,000 पर्यंतचे फायदे मिळू शकतात. याशिवाय 5.99% पासून व्याजदरासह काही फायनान्स पर्याय उपलब्ध आहेत.
फिचर्सच्या बाबतीत गिक्सर आणि गिक्सर एसएफमध्ये OBD-2B अनुरूप 155cc इंजिन असून ते 13.4 bhp पॉवर आणि 13.8 Nm टॉर्क देते. Suzuki Ride Connect, LED लाइटिंग, डिस्क ब्रेक आणि सिंगल-चॅनेल ABS यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. 250cc मॉडेल्समध्ये 26.1 bhp पॉवर, 22.2 Nm टॉर्क आणि 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. तर FFV मॉडेल 27.5 bhp आणि 22.5 Nm टॉर्कसह E85 पर्यंत इथेनॉल मिश्रित फ्युलवर चालू शकते.






