(फोटो सौजन्य-AI एआय)
सिम्पल एनर्जीने आपली पहिली फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘सिम्पल व्हेव’ भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सादर केली आहे. ही स्कूटर तीन प्रमुख व्हेरियंट्स आणि सहा ट्रिम्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. याची सुरुवातीची प्राारंभिक किंमत १,०९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे. टॉप-स्पेक्ट ‘सिम्पल व्हेव प्लस’ मॉडेलमध्ये ५ kWh ची बॅटरी, २४३ किमीची IDC रेंज आणि ९० किमी प्रतितास असा वेग मिळतो. या स्कूटरची डिलिव्हरी सप्टेंबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल.
७० लिटरची प्रचंड स्टोरेज क्षमता आणि उत्तम डिझाइन
युजेबिलीटी लक्षात घेता या स्कूटरमध्ये तब्बल ७० लिटरची स्टोरेज जागा देण्यात आली आहे, जी तीन भागात विभागली आहे. यात सीटखाली ६३ लिटरची मुख्य जागा, सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिलेली ४ लिटरची ‘पिल’ ऑक्झिलरी स्टोरेज आणि ३ लिटरचा ग्लोव्ह बॉक्स समाविष्ट आहे. याशिवाय या स्कूटरमध्ये १३४७ मिमीचा व्हीलबेस, १५० किलोची वजन वाहून नेण्याची क्षमता, ७७५ मिमी सीटची उंची आणि १७५ मिमी ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो. ही स्कूटर ३०० मिमी खोल पाण्यात सहज चालू शकते.
Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
बॅटरी, इंजिन आणि रेंज पर्याय
ग्राहकांसाठी ५ kWh, ३.७ kWh, २.७ kWh आणि २.२ kWh असे चार बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. ५ kWh क्षमतेची बॅटरी २४३ किमी रेंज देते, तर ३.७ kWh बॅटरी १७१ किमी, २.७ kWh बॅटरी १३२ किमी आणि २.२ kWh बॅटरी ११० किमीची IDC रेंज देते. टॉप मॉडेलमधील ५ kWh ची बॅटरी ६.४ kW च्या PMSM मोटरशी जोडलेली आहे, जी १७९ Nm टॉर्क निर्माण करते.
फीचर्स, डिस्प्ले आणि चार्जिंग सुविधा
स्कूटरमध्ये व्हेरियंटनुसार ७-इंच TFT किंवा ५-इंच EBN डिस्प्ले देण्यात आला आहे. TFT स्क्रीन असलेल्या मॉडेल्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशन, GPS, कॉल व म्युझिक कंट्रोल आणि OTA अपडेट्स मिळतात. याशिवाय ट्रॅक्शन कंट्रोल, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, हिल-होल्ड असिस्ट, रिव्हर्स मोड आणि LED लाईटिंग यांसारखे फीचर्सही यात समाविष्ट आहेत. चार्जिंगबाबत बोलायचे तर, फास्ट चार्जिंगच्या मदतीने ही स्कूटर ० ते ८० टक्के फक्त २ तास १५ मिनिटांत चार्ज होते.
राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?
वेगाने वाढणारे नेटवर्क आणि बुकिंग
सिम्पल व्हेव स्कूटरचे बुकिंग देशभरातील ७५ पेक्षा जास्त शोरूम्समध्ये सुरू झाले आहे. कंपनीची सध्याची प्रोडक्शन क्षमता दरमहा ३,००० युनिट्स असून, मार्च २०२७ पर्यंत ही विक्री दरमहा १०,००० युनिट्सपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.






