फोटो सौजन्य- iStock
आपल्याकडे वाहन असल्यास त्या वाहनाचे इन्शुरन्स असणे सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे असते. या इन्शुरन्समध्ये ही अनेक प्रकार असतात. थर्ड पार्टी इन्शुरन्स ते कमप्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स अशा अनेक प्रकारात इन्शुरन्सची विभागणी केली जाते. जरी काही इन्शुरन्सचे प्रिमियम खूप कमी असले तरी आपल्या वाहनासाठी पूर्ण कव्हर असणारा इन्शुरन्स काढणे केव्हाही उत्तम पर्याय असतो. त्यामुळे योग्य त्या कंपनीचा पुर्ण कव्हर करणारा इन्शुरन्स काढणे महत्वाचे आहे. या इन्शुरन्स प्रकारामधील संपूर्ण किंमत देणारा इन्शुरन्स जाणून घेऊया
झिरो डेप्थ इन्शुरन्स:
झिरो डेप्थ इन्शुरन्स हा मोटार इन्शुरन्स पॉलिसीचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या कारचे कोणतेही नुकसान झाल्यास, कोणताही घसारा वजा न करता तुम्हाला त्या नुकसानाची संपूर्ण किंमत मिळते. या पॉलिसी अंतर्गत कोणतीही विमा कंपनी तुमच्या वाहनाच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च कव्हर करते, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
झिरो डेप्थ इन्शुरन्सचे फायदे:
संपूर्ण कव्हरेज मिळवा: विमा कंपनीकडून तुमच्या कारचे बंपर, टायर, प्लास्टिक, फायबर इत्यादी सर्व भागांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च उचलला जातो.
इशुरन्समध्ये घसारा नाही: सामान्य विमा पॉलिसीमध्ये, कारच्या भागांचे मूल्य त्यांच्या वापरानुसार कमी होते, ज्याला घसारा म्हणतात. मात्र झिरो डेप्थ पॉलिसीमध्ये असे होत नाही. त्यामुळे ग्राहकाला याचा सर्वात जास्त फायदा होतो.
आर्थिक सुरक्षा: कार अपघातानंतरही, तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत नाही, कारण विमा कंपनी कारच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देते.
या इन्शुरन्सचा लाभ कसा मिळवावा:
तुमच्या कारचा अपघात झाला आणि तुमच्याकडे झिरो डेप्थ इन्शुरन्स असल्यास, तुम्ही दावा केल्यावर तुमच्या कारच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च तुम्हाला मिळेल.
उदाहरणार्थ, जर तुमच्या कारचे बंपर हेडलाइट्स, मिरर खराब झाले असतील, तर त्यांच्या दुरुस्तीचा किंवा बदलीचा संपूर्ण खर्च विमा कंपनीद्वारे कव्हर केला जाईल. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे घसारा शुल्क भरावे लागणार नाही, ज्यामुळे तुमचा खर्च शून्य असणार आहे.
ही पोलिसी विशेषत: नवीन कारसाठी उपयुक्त ठरते, कारण त्यांना लागणारा घसारा हा जास्त असतो. मात्र ही पॉलिसी तुमचे त्या नुकसानापासून संरक्षण करते.