फोटो सौजन्य-istock
अनेक जणांना आपल्या लकी नंबरची नंबर प्लेट हवी असते. काही जणांना नंबर प्लेटमध्ये विशिष्ट अंक हवा असतो. काही जण वाहन नोदणीतील नंबर अंकाची बेरीज अमुक एक अंकच असायला हवा यासाठी आग्रही असतात. तर काही जण ज्योतिष्य शास्त्रानुसार वाहनांचा क्रमांक प्लेट निवडतात. या युनिक किंवा व्हीआयपी वाहन नोंदणी क्रमांक काही नवीन नाहीत. मात्र जर तुम्हाला तुमच्या नवीन वाहनासाठी एखादी विशिष्ट वाहन नोदंणी क्रमाकाच्या नंबर प्लेटची खरेदी करायची असेल, तर नेहमीपेक्षा जास्त पैसे देण्याची तयारी ठेवा. कारण महाराष्ट्रामध्ये कार वाहनांसाठी व्हीआयपी वाहन नोदंणी क्रमाक दर वाढले आहेत. जास्त दर हे ‘0001’ क्रमांकासाठी वाढले आहेत. तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांमध्ये 6 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरावी लागू शकते. सीरिजबाहेरील व्हीआयपी प्लेट्ससाठी, तर एखाद्याला 18 लाख रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागणार आहेत.
व्हीआयपी नंबरप्लेटची जास्त मागणी ही प्रामुख्याने व्यावसायिक, सेलिब्रिटी, नेते यांच्याकडून करण्यात येते. त्यांच्या अनेक कारमध्ये लकी नंबर अथवा अमुक एक नंबर असतोच. तसेच कारचा युनिक नंबर त्यांच्यासाठी स्टेटसचाही विषय असतो.
VIP नंबर प्लेटचे वाढलेले दर
2013 पासून VIP वाहन नोंदणी क्रमांकांचे दर वाढवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.