फोटो सौजन्य: Freepik
सप्टेंबरचा महिना चालू झाला आहे आणि याच सोबतच येणाऱ्या सणांची चाहूल सुद्धा लागली आहे. या सणासुदीच्या मुहूर्तावर अनेक जण आपली हक्कची कार विकत घेत असतात. जर तुम्ही सुद्धा सेप्टेंबरमध्ये नवीन कार विकत घेणायच्या तयारीत असलात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या महिन्यात 6 कार्स लाँच होणार आहेत. चला या कार्सबद्दल जाणून घेऊया.
Tata Motors 2 सप्टेंबर 2024 ला Tata Curvv चे ICE व्हर्जन नवीन कूप SUV म्हणून लाँच करणार आहे. याआधी ऑगस्टमध्ये कंपनीने या एसयूव्हीचे ईव्ही व्हर्जन लाँच केले होते ज्याची चांगलीच चर्चा झाली होती. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पर्यायासह 2 सप्टेंबर रोजी लाँच केली जाईल. ही कार जवळपास 12 ते 13 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत आणली जाईल अशी शक्यता आहे.
हे देखील वाचा: September 2024 मध्ये लाँच होणार ‘या’ बाईक्स, जाणून घ्या त्यांची किंमत
माहितीनुसार, स्कोडा 2 सप्टेंबर रोजी सेडान सेगमेंटमध्ये नवीन कार लाँच करू शकते. तसेच या महिन्यात स्कोडा स्लाव्हिया मॉन्टे कार्लो लाँच करण्याचीही तयारी सुरू आहे. कंपनीने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो जारी केला आहे. ज्यामध्ये कारचा हेडलाइट दाखवण्यात आला आहे. ही कार सध्याच्या स्लाव्हियापेक्षा अधिक पॉवरफुल इंजिनसह येऊ शकते.
EQS इलेक्ट्रिक SUV देखील मर्सिडीज लक्झरी कार सेगमेंटमध्ये लाँच करणार आहे. कंपनी अधिकृतपणे सांगितले आहे की 5 सप्टेंबर रोजी ही कार बाजारात दाखल होणार आहे. ही इलेक्ट्रिक मेबॅच एसयूव्ही असेल ज्यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले जातील. एकदा चार्ज केल्यानंतर, ही कार सुमारे 600 किलोमीटरपर्यंत चालवता येईल.
ह्युंदाई देखील 9 सप्टेंबर रोजी Alcazar SUV ची फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या SUV मध्ये NFC, ADAS सारखे काही उत्तम फीचर्स देखील दिले जातील. सध्याच्या व्हेरियंटच्या तुलनेत त्याच्या किंमतीत थोडी वाढ केली जाऊ शकते.
11 सप्टेंबर रोजी, JSW MG Motors द्वारे आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात येणार आहे, जी CUV सेगमेंटमध्ये आणले जाईल. या कारमध्ये काही उत्तम फीचर्स सुद्धा दिले जाईल, ज्यात पॅनोरॅमिक सनरूफ, ADAS, अधिक आरामदायी सीट्सचा समावेश आहे. एका चार्जमध्ये ही कार 460 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 17 ते 20 लाख रुपये असू शकते.
टाटा या महिन्यात Tata Curvv चे पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन लाँच करणार आहे. तसेच, Nexon चे CNG व्हर्जन देखील कंपनी या महिन्यात लाँच करू शकते. सध्या कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही पण सप्टेंबरमध्येच ते लाँच होण्याची शक्यता आहे.