महाराष्ट्र्रात फक्त आणि फक्त याच कारची हवा!
टाटा मोटर्सच्या अनेक कार महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. नुकतेच कंपनीची Tata Punch मुंबईकरांची लाडकी एसयूव्ही बनली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स (TMPV) सप्टेंबर 2025 मध्ये विक्रीच्या आकडेवारीनुसार भारतातील दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी वाहन उत्पादक कंपनी ठरली आहे. या यशामागे कंपनीच्या मजबूत कार्सच्या पोर्टफोलिओचा मोठा वाटा आहे. यामध्ये सर्वाधिक योगदान देणारी कार म्हणजे टाटा पंच (Tata Punch) — जी गेल्या काही महिन्यांत देशातील टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.
पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या तीनही व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेली टाटा पंच ही एक कॉम्पॅक्ट पण दमदार SUV आहे, जी तिच्या श्रेणीतील फीचर्ससाठी ओळखली जाते. या कारचे डिझाइन आणि सेफ्टी या सर्व बाबतींत ती इतर कार्सपेक्षा पुढे आहे. त्यामुळे SUV सेगमेंटमध्ये अपग्रेड करू इच्छिणाऱ्या ग्राहकांची तसेच पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्यांची ही पहिली पसंती ठरली आहे. खरं तर, देशभरातील सुमारे 69% पंच मालक हे पहिल्यांदा कार खरेदी करणारे ग्राहक आहेत, हे तिच्या लोकप्रियतेचं मोठं प्रमाण आहे.
Diwali 2025 मध्ये ‘या’ Best Bikes वरून एकदा नजर फिरवाच! किंमत 2 लाखांपेक्षा कमी
एप्रिल ते सप्टेंबर 2025 दरम्यान, टाटा पंचने महाराष्ट्रातील TMPV विक्रीत तब्बल 29% योगदान दिले आहे, ज्यामुळे ती राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय कार बनली आहे. मुंबई आणि ठाणे येथे या SUV ने विक्रीत दुप्पट वाढ नोंदवली आहे. याचे आकर्षक आणि स्पोर्टी डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेगमेंटमधील उत्तम सेफ्टी फीचर्स ग्राहकांना उत्तम परफॉर्मन्स देतात.
GST दरातील अलीकडील कपातीनंतर पंचसाठी मागणी आणखी वाढली आहे. नवरात्री 2025 दरम्यान पंचने TMPV च्या राष्ट्रीय विक्रीत 33% योगदान दिले, ज्यामुळे ती देशातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय वाहनांपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
‘टेक-इट-एनीव्हेअर’ या वृत्तीमुळे टाटा पंच शहरी रस्त्यांवर सहजपणे चालवता येते, तसेच एक्सप्लोरिंगचा आनंद देणारी SUV ठरते. तिच्या आकर्षक डिझाइन आणि सुलभ ड्रायव्हिंग अनुभवामुळे महिला ग्राहकांमध्येही पंच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. सध्या सुमारे 25% पंच EV मालक महिला आहेत, हा एक उल्लेखनीय आकडा आहे.
पंच ही ICE आणि EV दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी पहिली भारतीय कार आहे. 2021 मध्ये लाँच झाल्यापासूनच ती सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये अग्रस्थानी आहे. 2024 मध्ये ती भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली, आणि सप्टेंबर 2025 पर्यंत ही गती कायम ठेवत तिने टॉप 5 यादीत आपले स्थान मजबूत केले आहे.
टाटा पंचची विक्री फक्त मेट्रो शहरांपुरती मर्यादित नाही. प्रथम श्रेणी शहरे (24%), द्वितीय श्रेणी शहरे (47%), आणि तृतीय श्रेणी शहरे (29%) अशा सर्व बाजारपेठांमध्ये तिचा मालकीहक्क मोठ्या प्रमाणात आहे.