फोटो सौजन्य: iStock
सप्टेंबर 2025 हा महिना भारताच्या कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला होता. ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशन (TMA) च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरात मागील महिन्यात 1.46 लाखांहून अधिक ट्रॅक्टर विकले गेले, जे ऑक्टोबर 2024 मध्ये स्थापित केलेल्या 1,44,675 युनिट्सच्या मागील विक्रमाला मागे टाकते. या लक्षणीय वाढीमागील मुख्य कारणे म्हणजे GST मध्ये झालेली कपात आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी. चला याबद्दल अधिक माहिती घेऊयात.
नवीन GST Rates पावले रे बाबा! TVS Jupiter 125 च्या किमतीत मोठी घट, किंमत आता फक्त…
भारत सरकारने 22 सप्टेंबर 2025 पासून ट्रॅक्टरवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा केली आहे. आता ट्रॅक्टरवरील जीएसटी दर 12% वरून कमी करून केवळ 5% करण्यात आला आहे. तसेच 1800 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या रोड ट्रॅक्टरवरील कर 28% वरून घटवून 18% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ट्रॅक्टरच्या किंमतीत घट झाली असून शेतकऱ्यांसाठी खरेदी अधिक परवडणारी ठरली आहे.
सप्टेंबर 2025 मधील जबरदस्त विक्रीमुळे वर्षभराचे आकडे विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2025 दरम्यान एकूण 7.61 लाख ट्रॅक्टरची विक्री झाली असून, ती गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 20 टक्क्यांनी जास्त आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की दिवाळीच्या सिझनमध्ये ट्रॅक्टरची मागणी आणखी वाढेल. हीच गती कायम राहिली तर भारताचा ट्रॅक्टर बाजार वार्षिक 10 लाख युनिट्सची विक्री पार करू शकतो, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे विक्रम ठरेल.
Royal Enfield बाईक खरेदी करणार आहात? कंपनीने 350cc Bikes मध्ये केला महत्वाचा बदल
याशिवाय, या वर्षीचा मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहिल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशात सरासरी पर्जन्यमान 108 टक्क्याने नोंदवले गेले, ज्यामुळे पिकांच्या उत्पादनात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
Escorts Kubota ने सप्टेंबर 2025 मध्ये आपल्या इतिहासातील सर्वात मोठी विक्री नोंदवली आहे. कंपनीची विक्री तब्बल 49% वाढून 17,800 युनिट्सपर्यंत पोहोचली. त्याचवेळी Sonalika Tractors ने 27,800 युनिट्सची विक्री करून जवळपास दुप्पट वाढ साधली आहे. हे आकडे दर्शवतात की भारताचा ट्रॅक्टर बाजार आता नव्या उंचींकडे वेगाने वाटचाल करत आहे.