फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे नेहमीपासूनच खूप मोठे क्षेत्र राहिले आहे. म्हणूनच या इंडस्ट्रीमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी देश तसेच विदेशातील ऑटो कंपनी आपल्या उत्तोमोत्तम कार्स भारतीय मार्केटमध्ये लाँच करत असते.
भारतात अनेक ऑटो कंपनीज आहेत ज्यांच्या कार्सवर ग्राहक आजही डोळे बंद करून विशेष ठेवतात. यातीलच एक कंपनी म्हणजे होंडा. होंडा कंपनी अनेक वर्षांपासून भारतात उत्तम कार्स ऑफर करत आहे. कंपनीच्या अनेक कार्स मार्केटमध्ये लोकप्रिय सुद्धा ठरल्या आहेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे होंडा अमेझ. आता कंपनी लवकरच या कारचे नवीन जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे.
होंडाने नवीन कॉम्पॅक्ट सेडान अमेझचे नवीन जनरेशन मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे. नवीन Honda Amaze पुढील महिन्याच्या सुरुवातीला 4 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. ऑटोमेकर्सनी टीझरमध्ये नवीन कारच्या इंटिरिअरची झलकही दाखवली आहे. नवीन अमेझमध्ये अनेक नवीनतम फीचर्स समाविष्ट होणार आहेत.
हे देखील वाचा: रतन टाटा यांची Jaguar कंपनी लवकरच आणणार आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक कार
होंडा अमेझचे तिसऱ्या जनरेशनचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहे. नवीन टीझरमध्ये नवीन Honda Amaze ची फोटोज शेअर करण्यात आली आहेत. या फोटोंमध्ये या कारचा लूक होंडा सिटीसारखा दिसत आहे. या वाहनाचे पुढचे टोक एका बोर्डसारखे आहे, ज्यावर हेडलाइट्सला जोडणारी एक मोठी क्रोम पट्टी आहे. त्याच्या बंपर डिझाईनमध्ये वेगवेगळे कटही करण्यात आले आहेत. जर आपण फक्त कारच्या फ्रंट डिझाइनबद्दल बोललो तर ही कार Honda Elevate सारखी दिसते.
या नवीन कारची मागील रचना होंडा सिटीसारखी आहे. या वाहनात बंपर डिझाइनसह रुंद टेल लॅम्प लावण्यात आले आहेत. होंडाचे हे नवीन मॉडेल थायलंडमधील Honda R&D Asia Pacific Center येथे तयार करण्यात आले आहे.
Honda City प्रमाणे, Amaze मध्ये देखील डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बसवले जाऊ शकते. ही कार नवीन डॅशबोर्ड पॅटर्नसह येऊ शकते. Honda Amaze च्या इंटिरिअरचे फोटोज पाहिल्यास असे दिसून येते की कारमधील टचस्क्रीनची जागा बदलण्यात आली आहे. यासोबतच ही कार वेगळ्या डिझाईनच्या स्टेअरिंग व्हीलसह येऊ शकते. या कारमधील स्टोरेज स्पेसही अधिक चांगली दिसते.
नवीन Honda Amaze 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असू शकते. या इंजिनसह CVT ट्रान्समिशन उपलब्ध होऊ शकते. तर स्टॅंडर्ड मॉडेल मॅन्युअल गिअर बॉक्ससह येऊ शकते. नवीन इंजिनमुळे ही कार पूर्वीपेक्षा चांगले मायलेज देईल. नवीन Honda Amaze भारतीय बाजारपेठेत लाँच झालेल्या मारुती डिझायरला टक्कर देऊ शकते.