फोटो सौजन्य- अधिकृत संकेतस्थळ
भारतातील ऑटोमोबाईल बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात कार लॉंचिग केले जात आहे. त्यामध्ये विशेषकरुन एसयुव्ही सेगमेंटच्या कारमध्ये वाढ होताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, भारतीय बाजारपेठेमध्ये आता Kia ( किया) ची नवीन प्रीमियम मध्यम आकाराची SUV लॉंच केली जाणार आहे. या Kia SUV कडून Mahindra XUV700 ला टक्कर दिली जाणार आहे. किया कंपनीची ही एसयुव्ही आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. ती एसयुव्ही आहे Kia Sportage. किया स्पोर्टेज कार ही कंपनीची प्रीमियम एसयुव्हीपैकी एक आहे.कारचा आकर्षक लूक हे प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे. हा लूक जागतिक ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरला होता.
Kia Sportage वैशिष्ट्ये
Kia Sportage मध्ये समोर एक्स आकाराचे हेडलॅम्प आणि ब्रँडच्या सिग्नेचर टायगर नोज ग्रिलसह आकर्षक आधुनिक डिझाइन आहे. तर मॉडेलच्या मागील बाजूस kia Carens या मॉडेलप्रमाणेच डिझाइन पाहायला मिळते.
Kia Sportage कारचे इंटीरियर
इंटीरियरबद्दल विचार केल्यास , ही कार कंपनीची सर्वात प्रीमियम ऑफर करणाऱ्या एसयूव्हींपैकी एक असल्याने, स्पोर्टेज फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह समृद्ध-केबिन अनुभव देते. मॉडेलमधील इतर प्रमुख ठळक वैशिष्ट्यांमध्ये तीन स्पोक स्टीयरिंग व्हील, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, रोटरी गियर लीव्हर, ADAS सूट आणि त्याच्या पॅकेजमध्ये बरेच काही समाविष्ट आहे.
किया स्पोर्टेज पॉवरट्रेन (Kia Sportage)
Kia Sportage 153 bhp आणि 192 Nm पीक टॉर्क निर्माण करणारे 2.0-लीटर NA पेट्रोल इंजिन आणि 183 bhp आणि 416 Nm पीक टॉर्क निर्माण करणारे 2.0-लिटर डिझेल इंजिन असू शकते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये या दोन्ही इंजिनांवर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स समाविष्ट असावेत.
कारची किंमत 30 ते 35 लाख रुपये (Kia Sportage)
सध्या कंपनी देशात स्पोर्टेज एसयूव्ही लॉंच करण्याबाबत लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. कियाने देशात नवीन कार्निवल(Carnival) आणि ईव्ही 9 (EV9) सादर केल्या आहेत. कंपनी येत्या वर्षात नवीन Clavis सादर करण्यासाठी सज्ज आहे. स्पोर्टेज ही कार कंपनीकडून येणाऱ्या वर्षात लॉंच करण्याची अपेक्षा केली जात आहे. या कारची किंमत ही 30 लाख रुपये ते 35 लाख रुपये अपेक्षित आहे. या कारच्या लॉंचिगमुळे Mahindra XUV700 ला थेट स्पर्धा मिळणार असली तरीही त्या श्रेणीतील अनेक कार्सना ही कार महत्वाची स्पर्धक ठरु शकते.
अनेक देशी परदेशी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून पुढील वर्षांच्या कारच्या लॉंचिगचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या 2025 मध्ये कार ग्राहकांसाठी अनेक आकर्षक कार पर्याय उपलब्ध होणार आहे हे निश्चित.