फोटो सौजन्य: Freepik
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन कार्स आणि बाईक्स लाँच होत आहे. येणार सणासुदीचा काळ पाहता अनेक वाहन उत्पादक कंपनीज आपल्या बाईक्स आणि स्कुटर्स सप्टेंबरच्या महिन्यात लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्ही सुद्धा येणाऱ्या सणासुदीच्या मुहूर्तावर आपली हक्काची बाईक घेण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण सप्टेंबर महिन्यात लाँच होणाऱ्या बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत.
जावाची नवीन बाईक 3 सप्टेंबरला लाँच होणार आहे. या नवीन बाईकमध्ये 334cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 22.2bhp पॉवर आणि 28.2Nm टॉर्क जनरेट करेल. त्याचे इंजिन 6-स्पीड युनिटशी जोडलेले आहे. या बाईकची किंमत कंपनीकडून 2 ते 2.10 लाख रुपये अशी ठेवली जाऊ शकते.
नवीन डिझाईन केलेली Hero Destini 125 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच केली जाईल. स्कूटरला सध्याच्या व्हेरियंटपेक्षा साइड लाइन आणि बॉक्सियर लुक असेल. यात 124.6cc एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन असेल, जे 9bhp पॉवर आणि 10.4Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. नवीन Hero Destiny 125 ची एक्स-शोरूम किंमत 80,000 ते 85,000 रुपये दरम्यान असण्याची संभावना आहे.
हे देखील वाचा:Royal Enfield ने लाँच केली Classic 350, जाणून घ्या फीचर्स आणि किमंत
BMW Motorrad ने F900 GS आणि F900 GS Adventure साठी भारतात बुकिंग सुरु केले आहे. या बाईक्सची अधिकृत लाँच तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या बाईक्स लाँच होऊ शकतात. इंजिनच्या बाबतीत, दोन्ही बाईकमध्ये 895cc टू-सिलेंडर इंजिन आहे. त्याचे इंजिन 105 bhp आणि 93 Nm टॉर्क जनरेट करते. भारतात त्याची F 850 GS किंमत 12.95 लाख रुपयांपर्यंत आणि F 850 GS Adventure ची किंमत 13.75 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
बजाजने अलीकडेच जगातील पहिली CNG बाईक Freedom 125 लाँच केली होती. या बाईकला मिळणारा प्रतिसाद पाहता आता कंपनी आपली पहिली इथेनॉलवर चालणारी बाइक लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाईक स्केचमधून तयार केली जाऊ शकते किंवा इथेनॉलवर चालण्यासाठी नॉर्मल मॉडेलमधून अपग्रेड केली जाऊ शकते.