Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंटर्नशिप योजना कितपत फायदेशीर, टोयोटा किर्लोस्कर मोटर खूश की नाखूश? जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी भारतीय बजेट सादर केला. यावेळी अनेक क्षेत्रांवर मोठमोठया घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच बजेट सादर झाल्यावर काहींनी याचे स्वागत केले आहे तर काहींनी या बजेटला विरोध दर्शविला आहे. पाहुयात टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे काय मत आहे?

  • By मयुर नवले
Updated On: Jul 24, 2024 | 08:10 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळीतील पाहिलं बजेट नुकतेच जाहीर झाले. यावेळी देशाच्या अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक क्षेत्रांसाठी महत्वपूर्ण घोषणा केल्या. बजेट सादर झाल्यानंतर अनेक लोकांनी आपल्या मिश्र प्रतिक्रिया या बजेटवर दर्शविल्या आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कॉर्पोरेट अफेअर्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनचे कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी सुद्धा या बजेटवर भाष्य केले आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत ते?

हे अर्थसंकल्प पूर्णपणे संतुलित आहे आणि सरकार पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. राजकोषीय तूट ४.९% वर ठेवून एकत्रीकरणाकडे वाटचाल करताना सामाजिक क्षेत्रावरील खर्चातही वाढ होत आहे. तसेच असा शब्दात टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी बजेट 2024 चे स्वागत केले आहे.

बजेटमध्ये तरुणांच्या विकासासाठी केलेल्या विशेष तरतुदीवर ते म्हणाले,”सरकारने MSME आणि उत्पादन क्षेत्रावर मुख्य उपाय आणि खास डिझाइन केलेल्या पॅकेजेसवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचे योगदान वाढण्यास मदत होईल. विद्यार्थी आणि तरुणांसाठी अनेक परिवर्तनात्मक उपायांसह शिक्षण आणि कौशल्यांवर वाढलेल्या भराचे आम्ही स्वागत करतो. याला पूरक म्हणून, CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) खर्चातून स्टायपेंडसह इंटर्नशिप योजना सुरू करणे खूप चांगली बाब आहे. यामुळे तरुणांचा वास्तविक कामाच्या वातावरणाशी संपर्क वाढेल.

यावेळी त्यांनी आपल्या कंपनीची भारताविषयी असणारा वचनबद्धता सुद्धा स्पष्ट केली. ते म्हणाले,”आमच्या कंपनी मध्ये, तरुणांचा कौशल्य विकास हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे जिथे आम्ही ‘स्किल इंडिया’ उपक्रमाशी संलग्न होऊन विविध कौशल्य कार्यक्रमांद्वारे त्यांना उद्योगासाठी तयार करण्यात योगदान देत आहोत. ‘Grow in India, Grow with India’ या आमच्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार करत, टोयोटा किर्लोस्कर मोटर भारताला ‘विकसित भारत’ बनवण्याच्या प्रयत्नांसाठी वचनबद्ध आहे”.

Web Title: Toyota kirloskar motor company views on union budget 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 08:09 PM

Topics:  

  • Union Budget 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.