फोटो सौजन्य: Social Media
सणासुदीच्या काळाची चाहूल लागत्याच क्षणी अनेक जण निरनिराळ्या गोष्टी खरेदी करण्यास बाहेर पडतात. आपलीकडे जर एखादी नवीन गोष्ट विशेषकरून कार किंवा बाईक खरेदी करायची असेल तर ती सणासुदीच्या मुहूर्तावरच घेण्याचा अनेकांचा मानस असतो. त्यामुळेच अनेक कार उत्पादक कंपनीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स मार्केटमध्ये आणत असतात. आता टोयोटा मोटर्सने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे.
या ऑफरअंतर्गत तुम्ही अर्बन क्रूझरमध्ये हैदर, हिलक्स, ग्लान्झा कारवर भरघोस डिस्काउंट मिळवू शकता. याशिवाय टोयोटा फॉर्च्युनरवरही सूट उपलब्ध आहे. तसेच टोयोटाच्या कार्सवर 5 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट दिली जात आहे.
हे देखील वाचा: July 2024 झाली 7500 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री,जाणून घ्या कोणत्या कार्सनी मारली बाजी
टर्बो-पेट्रोल इंजिन असलेल्या टोयोटाच्या अर्बन क्रूझर टेसर या महागड्या मॉडेलवर सुमारे 65,000 रुपयांची सूट मिळत आहे. टोयोटाच्या या एसयूव्हीमध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे. यासोबतच या एसयूव्हीमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील देण्यात आले आहे. टोयोटाच्या देशांतर्गत कारची किंमत 7.74 लाख रुपयांपासून ते 13.04 लाख रुपयांपर्यंत आहे.
या ऑफरमध्ये दुसऱ्या कारचे नाव टोयोटा ग्लान्झा असे आहे. या कारवर 68,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारची किंमत 6.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.69 लाखांपर्यंत जाते. ही कार 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह येते, जे 88.5bhp पॉवर जनरेट करते.
हे देखील वाचा: Maruti Suzuki कडून भारतातील लहान शहरांसाठी मोठी घोषणा, सुरु करणार Nexa Studio शोरुम
टोयोटाच्या या कारवर 75,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची किंमत 11.14 लाख रुपये आहे आणि ती 20.19 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. ही टोयोटा कार 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 9-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, हेड-अप डिस्प्ले, ॲम्बियंट इंटीरियर लाइटिंग, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते.
लोकप्रिय टोयोटा हिलक्सवर 5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. काही डीलर्स याहूनही जास्त सूट देऊ शकतात. या टोयोटा कारची किंमत 30.40 लाख ते 37.90 लाख रुपये आहे.