फोटो सौजन्य: YouTube
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात नेहमीच नवनवीन बाईक्स लाँच होत असतात. अनेक बाईक निर्मात्या कंपनीज नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी उत्तमोत्तम बाईक बनवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही हल्ली या कंपनीज तरुणांकडे विशेष लक्ष देताना दिसतात.
तरुणांना नेहमीच आपली बाईक ही दिसण्यात हटके असावी असे वाटत असते. त्यांच्यासाठी जितका बाईकचा परफॉर्मन्स महत्वाचा असतो तितकाच तिचा लूकदेखील असतो. त्यामुळेच अनेक कंपनीज या तरुणांना आक्रसहित करण्यासाठी जबदस्त लूक असणाऱ्या बाईक्स मार्केटमध्ये आणत असतात.
ट्रायम्फने 2024 च्या सुरुवातीला यूकेमध्ये नवीन डेटोना 660 लाँच केली होती. आता ही दमदार बाईक भारतीय बाजारपेठेतही दाखल झाली आहे. ही बाईक दिसण्यात जेवढी स्टायलिश आहे तितकीच पेर्फोर्मन्सच्या बाबतीत पॉवरफुल आहे. चला जाणून घेऊया यात कोणते खास फिचर्स असणार आहेत.
हे देखील वाचा: गणेशोत्सवादरम्यान बाईक- स्कुटर घ्यायचा प्लॅन करताय? Yamaha कडून आकर्षक ऑफर्सची घोषणा
ट्रायम्फ डेटोना 660 मध्ये 660cc, लिक्विड-कूल्ड, इन-लाइन 3-सिलेंडर इंजिन आहे, जे 95 PS पॉवर आणि 69 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात समोर 4-पिस्टन रेडियल कॅलिपरसह ट्विन 310 मिमी डिस्क आणि मागील बाजूस सिंगल-पिस्टन स्लाइडिंग कॅलिपरसह सिंगल 220 मिमी डिस्क आहे.
ट्रायम्फ डेटोनामध्ये एक लांब क्लिप-ऑन हँडलबार, अंडरबेली एक्झॉस्ट आणि ट्विन-एलईडी हेडलाइट सेटअप आहे. यासोबतच, या बाईकमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल, तीन रायडिंग मोड: स्पोर्ट, रोड आणि रेन आणि स्विच करण्यायोग्य ट्रॅक्शन कंट्रोल आहे. बाईकला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, फोन आणि संगीत नियंत्रणे ॲक्सेसरीज म्हणून देण्यात आली आहेत. इतर ॲक्सेसरीजमध्ये क्लास शिफ्ट, हीटेड ग्रिप, अंडरसीट यूएसबी सॉकेट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश असतो.
Triumph Daytona 660 भारतात 9.72 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत या बाईकची स्पर्धा Aprilia RS 660, Honda CBR 650R, Kawasaki Ninja 650 आणि आगामी Yamaha R7 शी होईल.