फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतात अनेक आकर्षित बाईकस लाँच होताना दिसत आहे. एकंदरीत ग्राहकांच्या बाईककडून असणाऱ्या अपेक्षा बदलत आहे, त्यामुळेच विविध बाईक निर्मात्या कंपनीज नेहमीच आपल्या ग्राहकांना उत्तम बाईक्स देण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे काही कंपनीज हल्लीच्या तरुणाईला आवडेल अशी लूक आणि हाय परफॉर्मन्स असणारी बाईक मार्केटमध्ये लाँच करत आहे.
आधी एक काळ होता जेव्हा बाईकला फक्त मायलेजच्या दृष्टिकोनातून पाहिले जायचे. पण आता जसा काळ बदलला आहे तशीच ग्राहकांची अपेक्षा सुद्धा बदलत आहेत. आता बाईक घेताना त्याचे डिझाइन, एक्सट्रा आणि स्मार्ट फीचर्सवर सुद्धा लक्ष दिले जाते.
आता नुकतेच ट्रायम्फ या बाईक निर्मात्या कंपनीने आपल्या आगामी बाईकची झलक असणारा टिझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये कंपनीने आपली नवीन बाईक 17 सप्टेंबर रोजी भारतात लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. चला जाणून घेऊया, न्यू ट्रायम्फ स्पीड 400 कोणत्या फीचर्ससह भारतात लाँच केली जाऊ शकते.
हे देखील वाचा: हायवेवर पेट्रोल संपल्यावर NHAI कडून फ्री पेट्रोल दिले जाते? काय आहे सत्य? जाणून घ्या
टीझरनुसार, असे दिसत आहे की या बाईकच्या नवीन व्हेरियंटमध्ये लाल-राखाडी पेंट स्कीम आहे, साइड काउलवर सिल्व्हर बॅजिंग आणि फ्युएल टॅन्कवर ट्रायम्फ लोगो आहे. ही बाईक स्पीड 400 वर आधारित असणार आहे.
ही सध्या कार्निव्हल रेड/फँटम ब्लॅक, कॅस्पियन ब्लू/स्टॉर्म ग्रे आणि फँटम ब्लॅक/स्टॉर्म ग्रे या तीन रंगांच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. त्याच वेळी, नवीन ट्रायम्फ स्पीड 400 नवीन कलर ऑप्शनमध्ये सुद्धा आणण्याची अपेक्षा आहे.
हे देखील वाचा: बाईकसाठी योग्य इंजिन ऑईल का आहे महत्वाचे? आजच जाणून घ्या
ही बाईक 400cc ची असणार आहे, याचे कारण म्हणेज यात 398cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन असेल जे 39.5bhp पॉवर आणि 37.5Nm टॉर्क जनरेट करेल.
ट्रायम्फ स्पीड 400 मध्ये ऑल-एलईडी लाइटिंग, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल-चॅनल एबीएस, राइड-बाय-वायर, यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट असेल. यामध्ये डिजिटल-ॲनालॉग स्क्रीन पाहता येईल, ज्यामध्ये फ्युएल गेज मीटर, डिजिटल टॅकोमीटर, गियर पोझिशन इंडिकेटर आणि ट्रिपची माहिती उपलब्ध असेल.
या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, अशी अपेक्षा आहे की ती 2.4 लाख ते 2.45 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असेल. ही बाईक अशा लोकांसाठी आणली जात आहे जे कमी किंमतीत प्रीमियम बाईक शोधत आहेत.