फोटो सौजन्य: Freepik
बाईक जशी दिसायला चांगली हवी तशीच ती परफॉर्मन्सच्या बाबतीत सुद्धा चांगली हवी. म्हणूनच तर आपण आपल्या बाईकची वेळोवेळी काळजी घेत असतो. तिची सर्व्हिसिंग करत असतो, नवीन मोडोफिकेशन्स त्यात ॲड करत असतो. पण जर तुम्ही तुमच्या बाईकमध्ये योग्य इंजिन ऑईल वापरत नसाल तर याचा बाईकच्या परफॉर्मन्सवर वाईट परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया, एक योग्य इंजिन ऑईल वापरल्यामुळे कोणते फायदे होतात.
योग्य इंजिन ऑइलमुळे इंजिनच्या वेगवेगळ्या भागांमधील घर्षण कमी होते. चुकीच्या इंजिन ऑइलमुळे अधिक घर्षण होईल, ज्यामुळे इंजिनचे भाग लवकर खराब होण्याची शक्यात आहे.
इंजिन ऑइल इंजिन थंड ठेवण्यास मदत करते. ऑईलचा दर्जा योग्य नसल्यास, इंजिनचे तापमान वाढू शकते, ज्यामुळे ओव्हरहाटिंग आणि नुकसान होण्याचा धोका वाढतो.
हे देखील वाचा: प्रत्येक कारमध्ये असते ‘हे’ जादूई फीचर, वापर केल्यास मायलेजमध्ये होते कमालीची वाढ
इंजिन ऑइल इंजिनमध्ये तयार होणारे कण आणि घाण साफ करते. ऑइल योग्य प्रमाणात नसल्यास, बाइकच्या आत घाण साचते, ज्यामुळे इंजिन ब्लॉक होऊ शकते व काही वेळेस खराब देखील होऊ शकते.
योग्य इंजिन ऑइल वापरल्याने इंधनाचा वापर कमी होतो कारण इंजिन कमी घर्षणाने अधिक कार्यक्षमतेने चालते. चुकीच्या ऑइलमुळे, इंजिनला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो.
योग्य इंजिन ऑइलच्या वापरामुळे इंजिनच्या भागांचे संरक्षण होते, यामुळे इंजिनला दीर्घायुष्य मिळते. चुकीचे ऑइल त्वरीत इंजिन खराब करू शकते. यामुळे तुमच्या खिशाला चांगलीच कात्री बसू शकते.
योग्य ऑइलमुळे इंजिन सुरळीत चालण्यास मदत तर होतेच पण यामुळे बाईकची कार्यक्षमता सुद्धा सुधारते. चुकीच्या ऑइलमुळे इंजिन सुस्त होऊ शकते आणि परफॉर्मन्स खराब होऊ शकते.
तुम्हाला तुमच्या बाईकची वॉरंटी कायम ठेवायची असेल, तर त्या बाईकच्या निर्मात्याद्वारे शिफारस केलेले इंजिन ऑइल वापरा. चुकीचे ऑईल वापरल्याने तुमची वॉरंटी रद्द होऊ शकते.
योग्य इंजिन ऑइल वापरणे आणि ते नियमितपणे बदलणे देखील महत्त्वाचे आहे. जर ऑइल बराच काळ बदलले नाही किंवा चुकीचे ऑइल वापरले गेले, तर इंजिनमध्ये घाण साचल्याने त्याचे परफॉर्मन्स खराब होऊ शकते.