फोटो सौजन्य- TVS Website
भारतातील सर्वात प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी TVS कडून Apache RR 310 नवीन मॉडेल 16 सप्टेंबर 2024 रोजी भारतात लॉंच करणे अपेक्षित आहे. या बाईकच्या अधिकृत लाँच होण्याआधी, ग्राहकांना बाईकची बुकींग करता येणार आहे. अवघ्या 5000 बुकिंग रकेमवर भारतभरातील निवडक डीलर्सकडे ग्राहक ही बाईक बुक करु शकतात. Apache RR 310 चे पहिले मॉडेल हे 2018 मध्ये लॉंच करण्यात आले होते, ही बाईक किफायतशीर स्पोर्ट्स बाइक्सपैकी एक आहे.
या नव्या Apache RR 310 मॉडेलमध्ये अनेक अपडेट्स मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच बाईकच्या किमतींमध्ये किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या आउटगोइंग आवृत्तीची एक्स शोरुम किंमत ही 2.72 लाख रुपये आहे.
हे देखील वाचा-
Apache RR 310 मधील अपेक्षित वैशिष्ट्ये
नवीन Apache RR 310 च्या समोर आलेला प्रतिमांमधून या बाईकमध्ये स्पोर्टबाईक प्रमाणेच त्याच्या फेअरिंगवर विंगलेट असणार आहेत. बाईकमधील रीस्टाइल केलेल्या बॉडीवर्क शिवाय, TVS कडून नवीन रंगांमधील पर्याय देखील दिले जाणार आहेत. आऊट गोईंग मॉडेलमध्येही आधीपासूनच लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत. RTR310-सारख्या बिट्सच्या समावेशामुळे बाईक अधिक आकर्षक होऊ शकते. हे क्विक शिफ्टर, कूल्ड सीट, क्रूझ कंट्रोल आणि बऱ्याच काही वैशिष्ट्यांचा बाईकमध्ये समावेश होणार आहे. TFT ( Thin Film Transistor) स्क्रीन, जी आधीच माहितीने भरलेली आहे. स्क्रीनच्या थीम आणि इंटरफेसमध्ये काही बदल देखील पाहू शकतात. बाईकमध्ये रीअर-लिफ्ट संरक्षण, अडॅप्टिव्ह हेडलाइट्स, ट्रॅक्शन कंट्रोल, यांसारख्या प्रगत रायडर एड्सचा समावेश असू शकतो. तसेच बाईकमध्ये एकापेक्षा जास्त रायडिंग मोडही असू शकतात.
Apache RR 310 अपेक्षित इंजिन
Apache RR 310 अधिक हॉर्सपॉवर बनवण्यासाठी बाईकचे इंजिन देखील अपडेट केले जाऊ शकते. कंपनीने RTR310 प्रमाणे इंजिन बदलल्यास, पॉवर आउटपुट 33.5bhp वरून 35bhp वर जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार TVS ने त्याच्या चाचण्यांमध्ये त्याच मोटरमधून पॉवर आऊटपूट हे 40bhp देखील असू शकते. हे झाल्यास बाईकसाठी महत्वाचे असणार आहे.
TVS Apache RR 310 ची बाजारातील मुख्य स्पर्धा ही KTM RC 390 असणार आहे. KTM RC 390 बाईकची एक्स शो रुम किंमत ही रु. 3.21 लाख रुपये आहे. या बाईकमुळे स्पोर्ट्स बाईक चाहत्यांना नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.