फोटो सौजन्य: Freepik
बाईक चालवण्यापेक्षा तिला मेन्टेन ठेवणे फार महत्वाचे असते. यातच जर तुमच्या बाईकमधील इंजिन सुद्धा अधिकच तापत असेल तर हे खराबीचे संकेत असू शकतात. बाईकमधील इंजिन तापण्याचे अनेक कारणे असू शकतात. यातीलच काही पुढे नमूद करण्यात आले आहे.
जर बाईकमधील कुलिंग सिस्टीम नीट काम करत नसेल तर त्याचा परिणाम इंजिनवर होऊ शकतो. परिणामी इंजिन अधिकच तापू शकते. त्यामुळेच कुलिंग सिस्टीम व त्यातील कुलिंग फॅन एकदा तपासून घ्यावे.
इंजिन मध्ये ओईलची कमतरता असल्यामुळे इंजिनच्या भागात घर्षण वाढू शकते, ज्यामुळे इंजिन अधिकच तापू शकते. त्यामुळे नेहमी आपल्या बाईकला पुरेसे ऑईल मिळत आहे ना याची खात्री करून घ्यावी. तसेच जर ऑईल जुने झाले असेल तर त्याला बदलून घ्यावे.
बाईकच्या ऑईल पंपमध्ये असणारी खराबी इंजिन पर्यंत पूर्ण क्षमतेने ऑईल पुरवत नाही, ज्यामुळे इंजिन तापते व पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नाही.
एअर फिल्टरमध्ये घाण जमा झाल्यामुळे इंजिनला योग्य प्रमाणात हवा मिळत नाही, ज्यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते. यावर उपाय म्हणजे एअर फिल्टर साफ करा किंवा बदला.
अयोग्य इग्निशन वेळेमुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते. योग्य मेकॅनिककडून इग्निशन वेळ तपासा आणि दुरुस्त करा.
जर तुमच्या बाईकेचे रेडिएटर ब्लॉक झाले असेल तर कुलिंग योग्य प्रकारे काम करू शकत नाही. ही समस्या टाळण्यासाठी रेडिएटरची सफाई करणे आवश्यक आहे.