फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच महागड्या किंमतीच्या कार्स चर्चेचा विषय बनतात. या लक्झरी कार्स जर रस्त्यावरून जाताना दिसल्या की नक्कीच अनेकांच्या नजर त्या कारवर रोखल्या जातात. देशात अनेक लक्झरी कार उत्पादक आहेत ज्या त्यांच्या हाय परफॉर्मन्स कारसाठी लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक लक्झरी कार उत्पादक कंपनी म्हणजे Land Rover ज्याच्या रेंज रोव्हर कार्स जगभरात प्रसिद्ध आहे.
रेंज रोव्हर कार्स या फक्त त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठीच नव्हे तर महागड्या किंमतीसाठी सुद्धा ओळखल्या जातात. अनेक सेलिब्रेटीज आणि राजकीय नेते मंडळी या कार्स वापरताना दिसतात. अनेकांना रेंज रोव्हर कार खरेदी करण्याची इच्छा असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन आपण या कारच्या सर्वात स्वस्त मॉडेल किती डाउन पेमेंटवर खरेदी करू शकतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.
1 जानेवारी 2025 पासून ‘या’ बाईकच्या किंमतीत वाढ, डिसेंबरमध्येच करा खरेदी
भारतात रेंज रोव्हर कारचे अनेक मॉडेल्स आहेत. परंतु ही कार खरेदी करणे सामान्य माणसासाठी खूपच कठीण काम आहे, कारण ही कार बरीच महाग असते. या कारच्या बहुतांश मॉडेल्सची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याची सर्वात स्वस्त कार इव्होक आहे, ज्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. या रेंज रोव्हर कारची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख रुपये आहे.
नोएडामधील रेंज रोव्हरच्या 2.0-लीटर डायनॅमिक एसई डिझेल व्हेरियंटची ऑन-रोड किंमत 78.21 लाख रुपये आहे. इतर शहरांमध्ये या कारच्या किंमतीत फरक दिसू शकतो. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे 70.40 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. तुम्ही चार वर्षांसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला एकूण 82.48 लाख रुपये कर्ज भरावे लागेल. जर तुम्ही हे कर्ज सहा वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला एकूण 88.86 लाख रुपये भरावे लागतील. ही कार खरेदी करण्यासाठी दरमहा किती रुपयांचा हप्ता भरावा लागेल त्याबद्दल जाणून घेऊया.