फोटो सौजन्य: Social Media
देशात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपनीज आहेत ज्या त्याच्या हाय परफॉर्मन्स आणि महागड्या किंमतीमुळे ओळखल्या जातात. यातीलच एक कार उत्पादक कंपनी म्हणजे व्होल्वो. या कंपनीच्या कार्स अनेक सेलिब्रेटीज व नेते मंडळी यांच्या कार कलेक्शनमध्ये हमखास पाहायला मिळतात. व्होल्वोच्या कार्स रस्त्यावर धावताना दिसल्या की एक वेगळाच थाट असतो. अनेक कार्सप्रेमींचे तर ही कार खरेदी करणे हे स्वप्न असते.
व्होल्वोच्या प्रत्येक कार्सची किंमत ही एक कोटीपेक्षा जास्त असते. त्यामुळेच अनेकांना या कंपनीच्या कार्स खरेदी करताना घाट फुटत असतो. पण तरी एक साहजिक प्रश्न मनात येतो की जर या कंपनीच्या कार्स लोनवर विकत घेतल्या तर याचे ईएमआय किती असेल. हीच गोष्ट लक्षात घेऊन आज आपण Volvo XC90 खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट आणि ईएमआय द्यावा लागेल, याबद्दल जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
Range Rover ची सर्वात स्वस्त कार खरेदी करण्यासाठी किती करावे डाउन पेमेंट? किती असेल EMI?
व्होल्वो कार केवळ देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. या ब्रँडच्या कार उत्तम सेफ्टी देण्यासाठी ओळखल्या जातात. Volvo XC90 ही देखील एक उत्तम लक्झरी कार आहे. या कारमध्ये 1969 सीसीचे इंजिन आहे. कारमध्ये बसवलेले हे इंजिन 300 bhp पॉवर आणि 420 Nm टॉर्क प्रदान करते. या कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे. कारमध्ये 7 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.
Volvo XC90 ची किंमत ही तब्बल 1.17 कोटी रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते. पण 1 कोटींहून अधिक किंमतीची कार खरेदी करणे सामान्य माणसासाठी थोडे कठीण काम आहे. पण ही कार कार लोनद्वारेही घरी आणता येऊ शकते. ही लक्झरी कार खरेदी करण्यासाठी आधी लाख रुपये डाऊन पेमेंट करावे लागतील. यासोबतच ज्या कालावधीसाठी कर्ज घेतले आहे त्यानुसार दर महिन्याला हप्ता जमा करावा लागणार.
Volvo XC90 खरेदी करण्यासाठी बँकेकडून तुम्हाला सुमारे 1 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. कार खरेदी करण्यासाठी आधी तुम्हाला 12 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. यानंतर बँकेने लावलेल्या व्याजदरानुसार दरमहा ईएमआय भरावा लागेल. हा व्याजदर प्रत्येक बँकेनुसार वेगळा असू शकतो.
जर बँक कार लोनवर 8 टक्के व्याज आकारत असेल तर चार वर्षांच्या कर्जासाठी तुम्हाला दरमहा 2.60 लाख रुपये बँकेत जमा करावे लागतील. हे कर्ज पाच वर्षांसाठी घेतले असल्यास दरमहा 2.15 लाख रुपयांचा हप्ता जमा करावा लागेल. सहा वर्षांसाठी कार लोनवर दरमहा 1.86 लाख रुपये हप्ता म्हणून जमा करावे लागतील. तर सात वर्षांसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला दरमहा 1.66 लाख रुपये बँकेत जमा करावे लागतील.