फोटो सौजन्य: Social Media
या वर्षात अनेक उत्तम कार्स मार्केटमध्ये लाँच झाल्या, ज्या अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. ग्राहकांची आपल्या कारकडून असणाऱ्या अपेक्षा समजून ओळखून ऑटो कंपनीजने देखील उत्तम कार्स मार्केटमध्ये आणल्या होत्या. यातीलच एक कार म्हणजे किया कंपनीची कार्निवल. ही कार चर्चेत राहण्याचे मुख्य कारण म्हणजे तिची महागडी किंमत. ही कार मार्केटमध्ये लाँच होताच, अनेक जणांनी या कारच्या दमदार परफॉर्मन्स आणि आकर्षक लूकमुळे कौतुक केले होते.
या वर्षी लाँच झालेल्या नवीन जनरेशन किया कार्निव्हल प्रीमियमने मार्केटमध्ये येताच लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. परंतु, या कारची किंमत खूप जास्त आहे, ज्यामुळे केवळ श्रीमंत लोकच ती खरेदी करू शकतात. तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल, तर किती डाउन पेमेंट आणि ईएमआयवर ती खरेदी केली जाऊ शकते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
भारतीय बाजारपेठेत, नवीन Kia कार्निव्हल लिमोझिन प्लस या एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. राजधानी दिल्लीत या कारची एक्स-शोरूम किंमत 63 लाख 90 हजार रुपये आहे. त्याच्या ऑन-रोड किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत त्याची किंमत 75 लाख 60 हजार रुपये आहे.
आता डाउन पेमेंट आणि ईएमआयवर ही लक्झरी कार तुम्ही कशी खरेदी करू शकता याबद्दल जाणून घेऊया. जर तुम्ही ही कार राजधानी दिल्लीत 11.72 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून खरेदी करत असाल तर तुम्हाला बँकेकडून 63.88 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तुम्हाला दरमहा किमान 1 लाख 29 हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. जेव्हा तुमच्या कर्जाच्या रकमेवर 8% व्याजदर आकारला जाईल तेव्हा असे होईल.
अशाप्रकारे, तुम्हाला 5 वर्षात बँकेला एकूण 15 लाख 69 हजार रुपये व्याज द्यावे लागेल. कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला एकूण 83 लाख 61 हजार रुपये बँकेत भरावे लागतील. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्ज आणि व्याजदर कितीही असतील, ते तुमच्या व्याजदर आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतात.
तुम्ही किया कार्निवल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा किमान मासिक पगार 3 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान असला पाहिजे. तेव्हाच तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करू शकता. जर तुमच्या बजेटमध्ये ही कार येत नसेल तर नक्कीच तुमच्या बजेटनुसार तुम्ही कार निवडा.