फोटा सौजन्य: iStock
कार विकत घेण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे फार महत्वाचे असते. अशावेळी जर तिचे मेंटेनन्स बरोबर झाले नाही तर कारच्या परफॉर्मन्सवर त्याच्या परिणाम होऊ शकतो. कारच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी इंजिन योग्यरीतीने कामं करणे फार महत्वाचे आहे. आणि इंजिनला योग्य ठेवते ते इंजिन ऑइल. पण तुम्हाला कारचे इंजिन ऑइल कधी बदलावे याबद्दल माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
कारचे इंजिन ऑइल बदलण्याची योग्य वेळ आणि मायलेज हे इंजिनचा प्रकार, ऑईलचा प्रकार आणि कार चालविण्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. साधारणपणे प्रत्येक 7,000 ते 10,000 किलोमीटर अंतरावर इंजिन ऑइल बदलण्याची शिफारस केली जाते. काही कार उत्पादक आणि सर्व्हिस मॅन्युअल असे सुचविते की हे अंतर 5,000 किलोमीटरपर्यंत असू शकतो, विशेषत: जर तुम्ही नियमितपणे ऑफ-रोडिंग करत असाल.
इंजिनला लुब्रिकेशन देणे: इंजिन ऑइल आपल्या इंजिनच्या सर्व मूव्हिंग पार्ट्सना लुब्रिकेट करते जेणेकरून ते झीज न होता योग्यरित्या कार्य करू शकतील. कालांतराने ऑइल घाण होते आणि त्याची लुब्रिकेशन क्षमता कमी होते.
जास्त गरम होण्यापासून बचाव: इंजिन ऑइल इंजिनला थंड ठेवण्यास मदत करते. जेव्हा ऑइल गलिच्छ किंवा जुने होते, तेव्हा ते उष्णता नष्ट करण्याची क्षमता गमावते, ज्यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते.
झीज कमी होते: नियमित ऑईलमधील बदल इंजिनचे आयुष्य वाढवतात कारण ते इंजिनमधील झीज कमी करतात.
वेळेवर इंजिन ऑइल न बदल्यास होऊ शकते नुकसान
इंजिन घासणे: जर तुम्ही वेळेवर ऑइल बदलले नाही, तर इंजिनच्या मूव्हिंग पार्ट्समध्ये जास्त प्रमाणात घर्षण होते, ज्यामुळे इंजिन लवकर खराब होऊ शकते.
इंजिन जास्त गरम होणे: जुने ऑइल इंजिनला पुरेशा प्रमाणात कूलिंग प्रदान करू शकत नाही, ज्यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते आणि यामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.
कारच्या कार्यक्षमतेत घट: इंजिनची शक्ती आणि मायलेज कमी होते. जर ऑइल खूप घाण झाले तर इंजिनमध्ये कार्बन जमा होऊ शकतो, ज्यामुळे इंजिन योग्यरित्या कार्य करू शकत नाही.
इंजिन जॅमिंग: जर तेल बराच वेळ बदलले गेले नाही तर इंजिन पूर्णपणे जाम होऊ शकते. परिणामी इंजिनची दुरुस्ती किंवा बदली करण्यात जास्त पैसे खर्च होऊ शकतात.