फोटो सौजन्य: Gemini
इलेक्ट्रिक कारचे वजन प्रामुख्याने त्यांच्या बॅटरीमुळे वाढते. साधारणपणे या बॅटरीचे वजन 300 ते 500 किलोग्रॅमपर्यंत असू शकते. उदाहरणार्थ, 50kWh क्षमतेची बॅटरी खूप जड असते. त्यामुळे Hyundai Creta Electric आणि Kia Carens Clavis EV सारख्या कार्स त्यांच्या पेट्रोल किंवा डिझेल व्हेरिएंटपेक्षा सुमारे 35–40% अधिक जड असतात. यामुळे कारच्या ड्रायव्हिंग डायनॅमिक्समध्ये बदल होतो.
एका चार्जवर 350 किमी धावणार! Tata Motors चा 450 kWh बॅटरी असलेला ‘हा’ ट्रक रस्ते गाजवण्यासाठी सज्ज
होय, वाहन निर्माते आता लाइटवेट इंजिनिअरिंगचा वापर करत आहेत. यामध्ये जड धातूऐवजी प्लास्टिक, ग्लास फायबर आणि इतर हलक्या पण मजबूत कंपोझिट मटेरियलचा वापर केला जातो. याशिवाय, कारमधील ऑडिओ सिस्टम आणि केबिनमधील काही भाग हलके बनवले जात आहेत. याचा मुख्य उद्देश गाडीची रेंज वाढवणे आणि कार्यक्षमता सुधारणे हा आहे.
जास्त वजनामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, कार थांबवण्यासाठी अधिक अंतर लागू शकते. तसेच, टायरवर अधिक दाब येत असल्याने ते लवकर घासले जाऊ शकतात. याशिवाय, गाडीची स्पोर्टी हँडलिंग काही प्रमाणात कमी होऊ शकते.
तुमच्या कारमध्ये CNG किट लावले जाऊ शकते का? जाणून घ्या सरकारी नियम आणि त्यामागील खर्च
कारमधील अतिरिक्त वजनाचे काही फायदेही आहेत. बॅटरी कारच्या खालील भागात बसवलेली असल्याने सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी राहते आणि कारचे संतुलन चांगले राहते. त्यामुळे उच्च स्पीडतही कार पलटण्याचा धोका कमी होतो. तसेच, जास्त वजनामुळे रस्त्यावर टायरची पकड अधिक मजबूत राहते.






