फोटो सौजन्य: YouTube
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढत असताना अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांना पहिले प्राध्यान्य देत आहेत. किंमतीला जरी ही वाहनं थोडी महाग असली तरी त्या मेंटेन करणे पेट्रोल वाहनांपेक्षा सोपे आहे. आधी फक्त इलेक्ट्रिक कार्सच मार्केटमध्ये लाँच होत होत्या. पण आता इलेक्ट्रिक बायकर्स आणि स्कुटर्स सुद्धा मार्केटमध्ये लाँच होत आहे. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक बाईक घेण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही अशा इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल सांगणार आहोत.
ही इलेक्ट्रिक बाईक रिव्हॉल्ट मोटर्सने भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड समाविष्ट आहेत. इको मोडमध्ये बाईक 45 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवता येते आणि त्याची रेंज 150 किलोमीटर आहे. सामान्य मोडमध्ये, बाईक 100 KMPH च्या वेगाने 65 च्या टॉप स्पीडने चालवता येते आणि स्पोर्ट्स मोडमध्ये, 80 किलोमीटरच्या रेंजसाठी 85 KMPH च्या वेगाने चालवता येते. बाईकमध्ये एलईडी लाइट्स, USD फोर्क्स, डिस्क ब्रेक्स, 17 इंच टायर यांसारखी अनेक फीचर्स आहेत.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये प्रॉक्सिमिटी अनलॉक, क्रूझ कंट्रोल, पार्टी मोड, टेम्पर अलर्ट, एआय आर्टिफिशियल असिस्टंट, स्मार्टवॉच ॲप, रोड ट्रिप प्लॅनर, समोर आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक, सिंगल चॅनल एबीएस, कॉर्नरिंग एबीएस, ॲप कनेक्टेड इत्यादी अनेक फीचर्स देखील समाविष्ट आहेत. बाईकमध्ये ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम, जिओ फेन्सिंग थेफ्ट प्रोटेक्शन यासारखे उत्तम फिचर्स आहेत.
हॉप ऑक्सोला एक इलेक्ट्रिक बाईक म्हणून देखील ऑफर केली जाते. ही बाईक एका चार्जवर 150 किलोमीटरपर्यंत चालवता येते, तर त्याचा टॉप स्पीड ताशी ९५ किलोमीटर इतका आहे. डिजिटल स्पीडोमीटरसोबतच, बाईकमध्ये USD फोर्क्स, पुढच्या आणि मागील चाकांवर डिस्क ब्रेक, इंटरनेट, GPS, ब्लूटूथ, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम यांसारखी अनेक फीचर्स दिली आहेत.
या बाइकमध्ये फोर स्पीड हायपर शिफ्ट गिअरबॉक्स उपलब्ध आहे. तसेच यामध्ये मोटर बसवल्याने हयी बाईक अवघ्या सहा सेकंदात 0-60 किमी वेगाने चालवता येते. यात राइडिंगसाठी चार मोड उपलब्ध आहेत. ही बाईक एका चार्जवर 125 किलोमीटरपर्यंत चालवता येते. बाईकमध्ये सक्रिय कुलिंगसाठी IITMS सिस्टिम देण्यात आली आहे. बाईकमध्ये एलईडी लाईट्स, सात इंची डिजिटल डिस्प्ले, एबीएस, ब्लूटूथ, मीडिया कंट्रोल्स, नेव्हिगेशन, पार्क असिस्ट अशी अनेक फीचर्स आहेत.