फोटो सौजन्य: YouTube
भारतात नेहमीपासूनच बाईक म्हंटली की अनेकांना ती स्टायलिश आणि जबरस्त परफॉर्मन्स असणारच हवी असते. पूर्वी बाईक घेताना अनेक जण फक्त मायलेजचा विचार करीत होते. परंतु बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या अपेक्षा सुद्धा बदलत आहे. त्यातही खासकरून तरुणांच्या आपल्या बाईककडून कोणत्या अपेक्षा आहे हे जाणण्यात कंपनी जास्त रस दाखवत आहे.
हल्लीच्या तरुणांना फक्त उत्तम मायलेज देणारी नव्हे तर दमदार फीचर्स आणि आकर्षित लूक असणारी बाईक हवी असते. हीच मागणी लक्षात घेत यामाहा कंपनी नेहमीच उत्तम डिझाईन असणारी बाईक लाँच करत असते. नुकतेच या जपानी दुचाकी उत्पादक कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीन व्हर्जन्ससह दोन बाईक लाँच केल्या आहेत. कंपनीने कोणत्या बाईक्स कोणत्या व्हर्जनसह आणल्या आहेत आणि त्याची किंमत काय आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया.
हे देखील वाचा: Mahindra Veero LCV भारतात झाली लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
यामाहाने मोटोजीपी एडिशनसह आपल्या दोन प्रीमियम बाईक्स मार्केटमध्ये लाँच केल्या आहेत. कंपनीने या बाइक्समध्ये अनेक कॉस्मेटिक बदल केले आहेत. कंपनीने R15 आणि MT-15 या बाईकमध्ये बदल केले आहेत.
बाईकमध्ये कुठले बदल झाले आहेत
सामान्य व्हर्जनच्या तुलनेत मोटोजीपी एडिशन बाईक्सच्या फ्युएल टँक आणि साइड पॅनलवर नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत. याशिवाय बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणे, R15 आणि MT15 मध्ये 155 cc इंधन इंजेक्टेड सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे 18.4 पीएस पॉवर आणि 14.2 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. यासोबत सिक्स स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
MT15 मधील बाईक्समध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, असिस्ट आणि स्लिपर क्लच, VVA, USD फोर्क्स, मोनोक्रॉस सस्पेन्शन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. या फीचर्ससह, R15 मध्ये क्विक शिफ्टर, संपूर्ण डिजिटल स्क्रीन, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टम, म्युजिक आणि व्हॉल्युम कंट्रोल, अपग्रेडेड स्विचगियर, एलईडी नंबर प्लेट देण्यात आली आहे.
यामाहाच्या R15 MotoGP एडिशनची एक्स-शोरूम किंमत 198800 रुपये ठेवण्यात आली आहे. तर MT-15 ची एक्स-शोरूम किंमत 173400 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत तुच्या जवळील शोरूमनुसार बदलू शकते.