Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुपर’ पेक्षा ‘हॅपी’हवी

मातृत्वाच्या पलीकडेही जीवन आहे, आईच्या भूमिकेव्यतिरिक्त तिचं स्वतःचं असं व्यक्तीमत्त्व आहे; पण ती अडकते ‘सुपरमॉम’च्या चौकटीत. सुरुवातीला छान वाटणारी ही चौकट कालांतराने बोचायला लागते. अशावेळी तिला यातून बाहेर पडावसं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. समान पालकत्व आणि घरातील श्रमांची विभागणी यासारख्या नव्या संकल्पनांची तिला निश्चितच मदत होईल. ‘सुपरमॉम’पेक्षाही ती ‘हॅपी मॉम’ असणं जास्त गरजेचं आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: May 29, 2022 | 12:20 PM
‘सुपर’ पेक्षा ‘हॅपी’हवी
Follow Us
Follow Us:

नुकतंच एका संस्थेने उन्हाळी शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरातील मुलांना विचारण्यात आलं की, ‘तुमची आई तुम्हाला कशी असायला हवी किंवा एका वाक्यात तुमच्या आईचं वर्णन कसं कराल?’ क्षणभर विचार करून नव्वद टक्के मुलांनी एकच उत्तर दिलं ते म्हणजे, “आम्हाला मॉमला ‘सुपरमॉम’ म्हणून रंगवायला आवडेल. ती आठ हात असलेल्या चित्रातल्या देवीसारखी दिसेल आणि….” मुलांचं हे उत्तर वजा अपेक्षा ऐकून काही आयांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आई झाल्याचं सार्थक झालं असा समाधानी भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. पण क्षणभरच! पुढच्याच क्षणी मुलांनी दिलेल्या उत्तरांनी सगळ्या ‘सुपरमॉम्स’ गोंधळून गेल्या. मुलं पुढे म्हणाली, “ती आठ हात असलेल्या चित्रातल्या देवीसारखी दिसेल. आम्हाला जे हवं ते सगळं करून देईल आणि दिवसभर आमच्याच सोबत असेल.” या शेवटच्या वाक्याने अनेक आयांना गोंधळात टाकलं. मुलांचा वयोगट साधारण ७ ते १५ वर्षांचा होता. वडिलांकडून या मुलांच्या फार काही अपेक्षा नव्हत्या. पण त्यांची आई त्यांना ‘सुपरमॉम’ असायला हवी होती.

गप्पा झाल्यावर मुलं पुन्हा खेळायला गेली. पण तिथे जमलेल्या ‘मॉम्स’ मात्र चिंतातूर दिसायला लागल्या. ‘आई रिटायर्ड होतेय’ नाटकाची मला आठवण झाली. काळ बदलला, संदर्भ बदलले पण आईच्या कपाळावर बसलेला ‘सुपरमॉम’चा शिक्का आणि अपेक्षा अजूनही कायम आहेत. आईने आपल्या सोबत असावं असं मुलांना वाटण्यात खरंतर काहीच वावगं नाही, पण तिने बाकी काहीच न करता कायम आपल्यासाठी राबावं, ‘उपलब्ध’ असावं मग ती नोकरी करणारी असो की गृहिणी असो, तिला गृहीत धरण्याची सवय खोलवर रुजली आहे हे प्रकर्षाने जाणवलं. फरक एवढाच आहे की पूर्वी ती ‘आई’ होती, आता ‘मॉम’ झाली आहे. हा शिक्का पुसला जावा असं तिथे जमलेल्या आयांनाही वाटत होतंच. मुलांचं संगोपन करणं, त्यांना हवं-नको ते बघणं या जबाबदाऱ्यांपासून तिला पळायचं नाहीये पण त्यात अडकूनही पडायचं नाहीये. मुलांनी स्वावलंबी व्हावं असं तिला वाटतंय आणि त्याचबरोबर सुपरमॉमची व्याख्या बदलायला हवी, असंही!‘मुलं मोठी होईपर्यंत त्यांना आईची गरज असते.

त्यानंतर ती त्यांच्या विश्वास रमतात मग आईच्या मागे-मागे फिरत नाहीत. मुलं मोठी झाली की करा तुम्हाला काय हवं ते.’ असा ‘प्रेमळ सल्ला’ तेवढ्यात एक आजी तिथे जमलेल्या आयांना देऊन गेल्या. त्यांचे अनुभवाचे बोल हो! पण या ‘मॉम्स’चं म्हणणं वेगळं होतं. त्यातील एक जण म्हणाली, “मुलांना घरातली सगळी कामं करून सतत चांगलंचुंगलं खायला घालणारी आई हवी असते. सासरच्यांना मुलांची, नवऱ्याची, सासू-सासऱ्यांची काळजी घेणारी आणि घरातील कामं व नोकरीचा समतोल साधणारी सून हवी असते. या अपेक्षांचं ओझं जास्त होतं.” दुसरी एक जण म्हणाली, “सुपरव्हिलनशी लढणारी आई म्हणजे सुपरमॉम अशी मुलांची कल्पना असते. हे सुपरव्हिलन म्हणजे मुलांना ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत त्या गोष्टी. तिथे आईने हस्तक्षेप करावा अशी त्यांची अपेक्षा असते.” या सगळ्या अपेक्षांबरोबर सुपरमॉमची रोज जुगलबंदी रंगत असते आणि मग एक दिवस तिला वाटतं की, यापलीकडेही आयुष्य आहे, हेच आपण विसरलोय! मग खेदाची, अपराधीपणाची भावना भेडसावत राहते. माझी एक पत्रकार मैत्रीण आहे. ती नेहमी म्हणते, “बायकांनाना सतत कुठल्याना कुठल्या प्रकारचा दोष (Guilt) स्वतःवर ओढवून घेण्याची घाणेरडी सवयच असते. मुलांना घरी ठेऊन नोकरीला गेल्या तरी त्यांना दोषी वाटतं आणि मुलांसाठी नोकरी सोडली तरी दोषी वाटतं.” ही सवय आपण बदलली पाहिजे हे मात्र अगदी खरंय.

मुलांना आईचं चित्र हे अष्टभूजा देवीसारखं रंगवावं असं वाटलं पण या हातांमध्ये त्रिशूल नाही तर किराणा सामानाची यादी, लॅपटॉप, झाडू, स्वयंपाकाची भांडी-कुंडी, मुलांच्या अभ्यासाची पुस्तकं असं काहीसं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. बालमनाच्या खुळ्या कल्पना म्हणून आपण सोडूनही देऊ पण हे चित्र बदलायला हवं नाहीतर त्यांच्या अपेक्षा वाढतच राहतील. हे चित्र बदलायचं म्हणजे नक्की काय करायचं, यावरही कुटुंबात, समाजात बोललं गेलं पाहिजे. सगळ्यात आधी जे छाप किंवा ठोकळे आपण बनवलेले आहेत ते मोडायला हवेत. अमुक एक काम आईचंच, यातून बाहेर पडायला हवं. मुलांच्या म्हणण्यानुसार त्या ‘सुपर’ आहेतच पण ते वेगळेपण मग साजरंही करता यायला हवं. आधी आपण हे मान्य करूया की, आई ही घरातली सगळ्यांची काळजीवाहू मंत्री असण्याबरोबर बाकीही बरचं काही आहे. आजकाल आधुनिक बाबा सुद्धा पालकत्व आणि घरातील कामांमध्ये समान भूमिका बजावतात, मात्र ही टक्केवारी वाढायला हवी.

जी आई मुलांसाठी कायम हजर असते ती आदर्श आई – हा विचार सोडून द्यायला हवा. शिबिरातील एका मुलाची आई म्हणाली, “काही वर्षांपूर्वी मी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ गृहिणी बनले. पण मग माझ्या लक्षात आलं की माझं कुटुंब अगदी साध्या घरगुती कामांसाठी सुद्धा पूर्णपणे माझ्यावर अवलंबून राहू लागलं आहे. या गोष्टी बदलण्याचा मी निर्णय घेतला. मी नवऱ्याला आणि मुलांना मूलभूत स्वयंपाक करायला शिकवला. जेव्हा मी कामानिमित्त बाहेर जाते तेव्हा मुद्दाम माझ्या मुलीला त्याच्या जवळ ठेवून जाते,जेणेकरून तो तिची पूर्णपणे काळजी घेऊ शकेल कारणही फक्त माझी जबाबदारी नाही.”

आपल्याकडे मुळात स्त्रियांना सांस्कृतिकदृष्ट्या कधीही ‘नाही’ म्हणण्याची सवय नसते. त्यामुळे एकेक गोष्टी त्यांच्या अंगावर पडत जातात. ही सवय आपण बदलायला हवी.समान पालकत्व आणि घरातील कामांची समान विभागणी ही काळाची गरज आहे. आईने सर्वकाही एकट्याने हाताळण्याची कल्पना सामाजिक रूढी-परंपरांमधून येते. पण आता ही कथा बदलली पाहिजे.बर्या च ‘मॉम्स’ना मदतीची गरज असते.

कुटुंबियांना दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण वाढून देण्याची गरज नाही. भूक लागल्यावर त्यांनी स्वतः अन्न वाढून घेऊन जेवलं पाहिजे, असं एका निवृत्त शिक्षिकेने मत मांडलं. पालकत्व हे सहकार्याचे काम आहे, असं त्या म्हणाल्या. आई-मुलाच्या नात्याइतकचं वडील-मुलाचं नातंही महत्त्वाचं आहे हे सगळ्या वडलांनी जाणलं पाहिजे. शिवाय, समान पालकत्वामुळे पालकांसोबतचं मुलांचं नातं सुधारतं. ‘सुपरमॉम्स’ म्हणतात की, असा जोडीदार मिळणं सुद्धा महत्त्वाचं आहे, जो पालकत्वात तितकाच पाठिंबा देईल. जेव्हा तिलातिच्या वेळेची आणि ‘स्पेस’ची गरज असते तेव्हा तो मदत करेल.’गरज असेल तेव्हा तुमच्या जोडीदाराला मदतीसाठी विचारा. असं विचारणं मुळीच गैर नाही हे आधी तुम्ही मनावर कोरून घ्या. असे जुने छाप पुसले गेले तर ‘सुपरमॉम’ ची मुलांच्या डोक्यातील संकल्पना बदलेल आणि ‘हॅपी मॉम’ चं नवीन चित्र ते रंगवतील.

मनीषा नित्सुरे-जोशी

manisha.nitsure@gmail.com

Web Title: Mom want to be happier than supermoms nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 12:20 PM

Topics:  

  • mom

संबंधित बातम्या

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.