Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेरंग : ‘सिंहासन’ची सिक्वेल मालिका होईल इतक्या घटना…

मराठीतही सिक्वेलचा ट्रेण्ड स्थिरावतोय. राजकारणात 'पडद्या'मागेच बरेच काहीना काही घडत/ बिघडत/ मोडत/ जोडत असते. त्या गोष्टी आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यात अनेकदा बदल, हुलकावणी अथवा बिघाड होतो. शह, काटशह, कुरघोडी, डावपेच, धोरणे, विश्वास, तर कधी विश्वासघात, कधी आश्वासन अशा अनेक गोष्टींतून राजकारण आपला खेळ खेळत असते. रंग बदलत असते. त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला समजत नाहीत आणि तशा त्या समजाव्यात अशी अपेक्षाही नाही. पण एकदम दूरही राहू नये. हे सगळं आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव टाकत असते.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 07, 2022 | 06:00 AM
there will be a sequel series of marathi movie sinhasan nrvb

there will be a sequel series of marathi movie sinhasan nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई पुणे मुंबई, अगं बाई अरेच्चा, टाईमपास, दे धक्का, दगडी चाळ, टकाटक, बॉईज हे तर झालेच पण विजय कोंडके यांनी “माहेरची साडी” या सर्वकालीन सुपर हिट सोशिक चित्रपटाच्या सिक्वेलची नुसती घोषणा करताच त्यांची आणि अलका आठल्येची अनेकांनी मुलाखतही घेतली.

मला वाटतं, सिक्वेलची हवा आहेच तर ‘सिंहासन’ चा एकच सिक्वेल नव्हे तर दुसरा, तिसरा अगदी चौथाही भाग यावाच. त्यासाठी आजच्या राजकारणातून भरभरुन ‘घटना, गोष्टी, घडामोडी माहिती, अनेक प्रकारचे खाद्य आणि मसाला मिळेल.
राज्याच्या राजकारणातील आपल्यासमोर येणाऱ्या कधी अपेक्षित तर अनेकदा अनपेक्षित गोष्टी सर्वज्ञात आहेत.

मीडियातून ते सतत वाहतेय. बातम्या, विशेष वृत्त, स्पेशल स्टोरी, अग्रलेख, फोटो यातून ते ‘नॉन स्टॉप’ सुरुच आहेत. असे काही घडले की अनेक गोष्टींना भारी गती येते. राजकारणात ‘पडद्या’मागेच बरेच काहीना काही घडत/ बिघडत/ मोडत/ जोडत असते. त्या गोष्टी आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यात अनेकदा बदल, हुलकावणी अथवा बिघाड होतो. शह, काटशह, कुरघोडी, डावपेच, धोरणे, विश्वास, तर कधी विश्वासघात, कधी आश्वासन अशा अनेक गोष्टींतून राजकारण आपला खेळ खेळत असते. त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला समजत नाहीत आणि तशा त्या समजाव्यात अशी अपेक्षाही नाही. पण एकदम दूरही राहू नये. हे सगळं आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव टाकत असते.

हे बरेचसे एखाद्या चित्रपट, नाटक, मालिका, वेबसिरीज यांना पूरक आहे ना? अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ ही वादळी वेबसिरीज, अरविंद जगताप लिखित व दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसिरीज आपल्यासमोर आल्या आहेत. अभिजीत पानसे आता ‘राजीनामा’ या वेबसिरीजच्या मेकिंगमध्ये गुंतलाय. पण महिनाभरात राज्याच्या राजकारणात अशा काही घडामोडी घडू लागल्या की, याचे लेखन होता होता त्यात सतत बदल करायची वेळ यावी आणि जे सतत रंग बदलते तेच खरे राजकारण.

मुद्रित माध्यम, चॅनल आणि डिजिटल अशा मीडियातून सतत ‘राजकारण दिसतेय’. राजकारणात न दिसणार्या् गोष्टीही अनेक. तर जे प्रत्येक निवडणुकीत आठवणीने मतदान न करता पिकनिक एन्जॉय करतात त्यांचेही राजकीय घडामोडींवर लक्ष गेले अथवा जातेय. एकूणच काय तर ‘हीच तर वेळ आहे सिंहासन या चित्रपटाच्या सिक्वेलची मालिका पडद्यावर आणण्याची!

विजय आनंद दिग्दर्शित ‘ज्वेल थीफ’ अथवा ‘तिसरी मंझिल’ अशा रहस्यरंजक म्युझिकल हिट सिनेमाप्रमाणे सतत धक्कादायक/ अनपेक्षित टर्न्स आणि ट्वीस्ट घडत घडत राज्यातील सत्तेचे राजकारण, सत्ताबदल, आरोप प्रत्यारोप आणि त्यासाठीचे सत्ताचक्र बदलत/बिघडत/घडत असतानाच डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ (१९७९) या चित्रपटाची आठवण येतेय हे या सर्वकालीन कसदार कलाकृतीचे मोठेच यश आहे. सद्यस्थितीत या चित्रपटाचे एकापाठोपाठ सिक्वेल अपेक्षित आहेत.

‘सिंहासन’ हा मराठीतील पहिला ‘पॉवर’बाज राजकीयपट म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठीचा सहकारी मंत्र्याचा आटापिटा खुद्द मुख्यमंत्रीच हाणून पाडतात आणि या सगळ्या राजकीय चालीकडे तटस्थपणे पाहत असलेल्या राजकीय पत्रकाराला अखेरीस चक्क वेड लागते, असा अंतर्मुख करणारा असाच या ‘सिंहासन’चा शेवट होता. ‘सिंहासन’नंतर चाळीस वर्षात जवळपास तीस-पस्तीस राजकीयपट मराठीत आले. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’, अनंत माने दिग्दर्शित ‘झेड पी.’, उज्ज्वल ठेंगडी दिग्दर्शित ‘वजीर’, श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘सरकारनामा’, समीर विध्वंस दिग्दर्शित ‘धुरळा’, जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘नागरिक’, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आजचा दिवस माझा’ अशा काही चित्रपटांच चर्चा रंगली.

‘सिंहासन’ हा चित्रपट अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबऱ्यांवर आधारित आहे. अरुण साधू मुळात पत्रकार, संपादक आणि साहित्यिक असल्याने राजकारण आणि समाजकारण यातील खाचाखोचा, बिटवीन द लाईन यांची भरपूर कल्पना असणारे लेखन, त्यामुळे त्यांच्या या कादंबरीत एका क्लासिक चित्रपटासाठीचे मटेरियल खूप होते.

विजय तेंडुलकर यांची बंदिस्त पटकथा आणि संवाद, हे विशेष उल्लेखनीय. ‘सिंहासन’ चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली. अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे साकारले. तर निळू फुले यांनी राजकीय पत्रकार दिगू साकारला. याशिवाय डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट्ट, मधुकर तोरडमल, सतीश दुभाषी, श्रीकांत मोघे, माधव वाटवे, मोहन आगाशे, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर, दिगंबर पितांबरे, लालन सारंग, रिमा लागू, पूर्णिमा पाटील, सुषमा तेंडुलकर, उषा नाडकर्णी, नंदू पोळ, राजा मयेकर इत्यादी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारलीय.

आज जर ‘सिंहासन’चा रिमेक अथवा सिक्वेल करायचा प्रयत्न केला तर? तर त्यात विक्रम गोखले, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, उषा नाडकर्णी, सचिन खेडेकर, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, अलका आठल्ये, किशोरी शहाणे, प्रिया अरुण, मृणाल कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, उपेंद्र लिमये, महेश मांजरेकर, शिवाजी साटम, सयाजी शिंदे, रेणुका शहाणे, सचिन पिळगावकर, अजिंक्य देव, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, पुष्कर क्षोत्री, किरण करमरकर, भरत जाधव, मंगेश देसाई, तेजस्विनी पंडित, संजय खापरे, रुचिता जाधव, गौरव घाटणेकर, नेहा पेंडसे, प्राजक्ता माळी असे दमदार आणि दोन तीन पिढीतील कलाकार हवेत. एखाद्या चित्रपटाचा रिमेक, सिक्वेल अथवा डब हे चित्रपट निर्मितीमधील महत्वाचे फंडे आहेत.

सत्तेच्या राजकारणात आघाडी अथवा युती का होते? ती गोष्ट कशा पध्दतीने आवश्यक असते. विरोधी पक्षाचे स्थान का असते? सत्ताधारी पक्षात बंडखोरी का होते? ती खरंच तात्विक असते काय? पक्षांतर्गत राजकारण म्हणजे काय? पक्षांतरबंदीचा कायदा काय आहे? हे सगळे आजच्या ग्लोबल युगात आवश्यक इतपत माहित पडावेसे वाटते.

ती गरज ‘सिंहासन’चे सिक्वेल पूर्ण करु शकतात. आता महत्वाचा प्रश्न आहे, हे आव्हान पेलणारे पटकथा व संवाद लेखक, दिग्दर्शक व कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत आहेत का? याचे उत्तर ‘होय ‘ असेच आहे. तशी बहुस्तरीय गुणवत्ता मराठी चित्रपटसृष्टीत नक्कीच आहे. फक्त आणि फक्त ‘सिंहासन’च्या सिक्वेलसाठीची इच्छाशक्ती हवी. तीदेखिल दाखवली जाईल.

पण…. पण एखाद्या सडेतोड संवादाला सेन्सॉर कात्रीत पकडणार नाही ना? पडद्यावरची एखाद्या व्यक्तिरेखेने एकादा राजकीय नेता दुखावणार नाही ना? तसे झालेच तर त्याच्या राजकीय कार्यकर्त्यांचे आंदोलन आलेच. म्हणजेच मल्टीप्लेक्सच्या काचा फुटण्याची भीती. अशा सगळ्याच परिस्थितीतून जावे लागत असल्याने ‘सिंहासन ‘ची सिक्वेल अवघड होते. पण आजच्या पिढीतील रसिकांचे ओटीटीवर जगभरातील अनेक भाषांतील आणि अनेक थीमवरील चित्रपट पाहणे आता सवयीचे आणि विशेष आवडीचे झाल्याने त्यांची चित्रपट या माध्यमाबद्दलची समज जास्त विचारात घ्यावी लागेल हेदेखील खरेच आहे.

‘सगळे काही सिंहासनासाठीच’ हे याचे कथासूत्र असेल हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच.
सिंहासन एक, खेळाडू अनेक, चाली अमर्याद, टर्न्स आणि ट्वीस्ट केवढे तरी असा हा मामला आहे…

दिलीप ठाकूर

glam.thakurdilip@gmail.com

Web Title: There will be a sequel series of marathi movie sinhasan nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • Navarashtra Update
  • nilu phule

संबंधित बातम्या

निळू फुलेंच्या लेकीने इंडस्ट्रीतलं सांगितलं कटू सत्य, म्हणाली, “सिनेसृष्टीत रील स्टार येतो आणि…”
1

निळू फुलेंच्या लेकीने इंडस्ट्रीतलं सांगितलं कटू सत्य, म्हणाली, “सिनेसृष्टीत रील स्टार येतो आणि…”

Navarashtra Woman Awards : भारती मुथा यांना नवभारत नवराष्ट्रचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान
2

Navarashtra Woman Awards : भारती मुथा यांना नवभारत नवराष्ट्रचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Navarashtra Woman Awards : कर्तृत्वान महिलांचा ‘नवराष्ट्र’कडून सन्मान; मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
3

Navarashtra Woman Awards : कर्तृत्वान महिलांचा ‘नवराष्ट्र’कडून सन्मान; मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

“बाई वाड्यावर या असं बाबांनी एकाही चित्रपटात म्हटलेलं नाही”, निळू फुले यांच्याबद्दल लेकीचा धक्कादायक दावा
4

“बाई वाड्यावर या असं बाबांनी एकाही चित्रपटात म्हटलेलं नाही”, निळू फुले यांच्याबद्दल लेकीचा धक्कादायक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.