भारत आता जगातील तिसरा सर्वांत मोठा 'अब्जाधीश केंद्र' बनला आहे. भारतातील अब्जाधीशांची संपत्ती चिनीपेक्षा जास्त असल्याचा रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. भारत जगातील तिसरे सर्वात मोठे ‘बिलियनेअर हब’ बनले आहे.
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कल्याण-शिळ रोडवर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मयदिपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र ही मदत मिळवण्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
BARC चा अत्याधुनिक ‘Isomed 2.0’ प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे वैद्यकीय आणि अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. Isomed 2.0’मुळे वैद्यकीय उपकरणे आणि बियाणे अधिक सुरक्षित होणार आहेत.
रस्ता नाही, पाणी नाही; तरीही बसवले ई-टॉयलेट! माथेरान पालिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे. वन जमिनीमध्ये नगरपालिकेचे ई-स्वच्छतागृह ठेवण्यात आल्याने माथेरानमधील वनविभाग सुस्त आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत…
ST बसमध्ये सवलतीचा प्रवास आता कटकटीचा होणार आहे. कारण एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी वृद्धांना तासंतास रांगेत थांबावे लागत आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन तयार आहे. ३ टप्प्यांत कृती आराखडा लागू केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पाणीपुरवठा होईल, यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली.
कोजागिरीनंतर झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तालुका कृषी कार्यालयात पंचनाम्यांचे ढीग साचले आहेत.
लोणार सरोवरातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे प्रकरण प्रकाशात आल्यानंतर उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली. २७ विभागांना नोटिसा या प्रकरणात न्यायालयाने विभागांना नोटिसा बजावल्या आहेत.
सरकारने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे. कर्जमाफीबाबत अद्याप शासनाने योजना जाहीर केलेली नाही.
मुरुडला CNG पंप कधी मिळणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. CNG पंप नसल्याने बस उशीराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महापालिकेचे आरोग्य बजेट पुन्हा चर्चेत आले आहे. कारण आता असा दावा केला जात आहे की, मुंबई महापालिका बजेटमध्ये जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे.
वसईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली. शतकानुशतके उभ्या असलेल्या या वारसा स्थळाच्या संवर्धन कार्याची दखल घेत जागतिक पातळीवर मोठा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. सत्ताधारी बविआ आणि भाजपकडून सावध पवित्र घेतला जात आहे.
सत्ताधारी भाजपने महासभेत डीपी रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सखोल चर्चा केली. हासभेचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठवला जाईल.
मंत्रिमंडळाने शुक्रवारी स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली. पहिला टप्पा २०१६ मध्ये स्थापन करण्यात आला. एफओएफ २.० ची रचना स्टार्टअप्समधील गुंतवणुकीची गती टिकवून ठेवण्यासाठी करण्यात आली.
ब्रिटिश काळापासून सुरू हातरिक्षा ओढण्याच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व ९४ हात रिक्षा चालकांना पर्यावरण पुरक ई-रिक्षा चालवण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मान राखत तरी शासनाने आपला दवाखाना पुन्हा नव्याने कार्यान्वित करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व रुग्णांकडून होत आहे.
सुरुवातील मोबाइल कार्यान्वित करण्यासाठी वर्षभरासाठी एक हजार रुपयांचे रिचार्ज मारून देण्यात आले होते. काही महिन्यांतच मोबाइलमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या.