Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकच दिवसात देशभरात 22 हजार कोटींची उलाढाल; करवा चौथच्या उत्सवामुळे विक्रेते मालामाल!

करवा चौथ उत्सवाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील विक्रेत्यांची तब्बल 22 हजार कोटींची उलाढाल झाली आहे. त्यामुळे एकच दिवसात विक्रेते मालामाल झाल्याचे पाहायला मिळाले.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 21, 2024 | 02:48 PM
एकच दिवसात देशभरात 22 हजार कोटींची उलाढाल; करवा चौथच्या उत्सवामुळे विक्रेते मालामाल!

एकच दिवसात देशभरात 22 हजार कोटींची उलाढाल; करवा चौथच्या उत्सवामुळे विक्रेते मालामाल!

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणासाठी देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने कपडे, दागिने, मेकअप, पूजा साहित्य आणि भेटवस्तू यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. परिणामी, बाजारापेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

देशभरात 22 हजार कोटींची उलाढाल 

दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) अंदाजानुसार, करवा चौथच्या मुहूर्तावर देशभरात 22 हजार कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 30 टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे. दिवाळीपर्यंत सणासुदीच्या काळात देशात 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाजही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा – फ्लाईट रद्द झाल्यास किती दिवसात मिळतो रिफंड, पैसे किती कापले जातात माहितीये का? वाचा… सविस्तर

कधी साजरा केला जातो हा सण

हिंदू धर्मात प्रत्येक सण-उत्सव, व्रत-वैकल्याला धार्मिक महत्व आहे. आज 20 ऑक्टोबर 2024 रोजी करवा चौथ व्रत पाळले जात आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांकडून रविवारी निर्जळी उपवास करण्यात आला. या दिवशी महिला दिवसभर पाण्याचा एक थेंबही पीत नाहीत. दरवर्षी हा उत्सव कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो.

हे देखील वाचा – करवा चौथच्या दिवशी पत्नीला द्या ‘या’ भेटवस्तू; ‘हे’ आहेत चांगले आर्थिक पर्याय, वाचा… सविस्तर!

दिवाळीसाठीही ग्राहकांची रेलचेल सुरु

दिवाळी काही दिवसांवर आली आहे. लोक त्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. लोक आपली घरे सजवण्यासाठी यातून भरपूर खरेदी करत आहेत. बाजारपेठेत स्वदेशी मालाला अधिक मागणी आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये मेड इन इंडिया उत्पादनांचा दबदबा आहे. काही ठिकाणी महिला मेहंदी लावत आहेत तर काही ठिकाणी बांगड्या खरेदी करत आहेत. नवनवीन व्हरायटीचे कपडे, शूज आणि घर सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठीही अनेक अनोख्या वस्तू आहेत. त्यामुळेच लोक यावेळी दिवाळीची जोरदार तयारी करत आहेत.

Web Title: 22 thousand crores turnover across the country in a single day due to karva chauth celebrations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 02:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.