करवा चौथच्या दिवशी पत्नीला द्या 'या' भेटवस्तू; 'हे' आहेत चांगले आर्थिक पर्याय, वाचा... सविस्तर!
देशभरात महिला आज कर्णचौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. आजचा दिवस हा विवाहित महिलांसाठी वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस असतो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या सणात करवा चौथच्या दिवशी पत्नी आपल्या पतीसाठी उपवास ठेवते. आणि चंद्र उगवल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडला जातो. भारतात, विशेषत: उत्तर भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाबद्दल मोठा उत्साह असतो. याशिवाय अलिकडे महाराष्ट्रात देखील हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या सणाच्या वेळी अनेक पती हे आपल्या पत्नीला भेटवस्तू देखील देतात. याच पार्श्वभुमीवर आज आपण कोणत्या आर्थिक भेटवस्तूंद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीला खुश करू शकतात याबाबत जाणून घेणार आहोत…
गोल्ड बाँड किंवा ईटीएफ
जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर तुमच्याकडे गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड बाँड सारखे पर्याय आहेत. तुम्ही ते खरेदी करू शकतात आणि ते तुमच्या पत्नीला भेट म्हणून देऊ शकतात. सोने ही अशी वस्तू आहे की ती केवळ दागिने म्हणून देण्याऐवजी गुंतवणूक म्हणून घेतली तर ती मजबूत परतावा देते आणि तुमच्या पत्नीला आर्थिक स्थैर्यही देऊ शकते.
(फोटो सौजन्य – istock)
पत्नीच्या नावे इक्विटी किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे
सध्या भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण असून, वर्षभरापूर्वी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम अनेक शेअर्समध्ये जवळपास दुप्पट झाली आहे. करवा चौथ ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर चांगले शेअर्स खरेदी करू शकतात.
म्युच्युअल फंडात एसआयपी
तुम्ही चांगली आर्थिक भेट देण्याच्या विचारात असाल तर म्युच्युअल फंडाकडे जाण्यास विसरू नका. आजकाल, करोडो गुंतवणूकदार एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत आणि त्यांच्याद्वारे चांगले परतावा देखील मिळत आहेत. जर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दर महिन्याला थोडीफार रक्कम गुंतवली, पण तुम्ही तुमच्या पत्नीला याबद्दल माहिती दिली. तर या आर्थिक भेटवस्तूद्वारे तिला तुम्ही आनंदी करू शकतात.
पीपीएफसारख्या बँकेत गुंतवणुकीचा पर्याय
तुम्ही तुमच्या पत्नीसाठी पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडू शकतात. याद्वारे तुम्ही त्या पीपीएफ खात्यात दरमहा काही रक्कम सतत जमा करू शकतात. आणि ईईईचा लाभ मिळवू शकतात. तुमच्या पत्नीलाही चांगले रिटर्न मिळतील आणि यामध्ये कर लाभही मिळू शकतात.
जीवन विमा किंवा टर्म प्लॅनसारखे पर्याय
जीवन विमा किंवा टर्म प्लॅनसारखे पर्याय नेहमीच कुटुंबाच्या गरजांसाठी असतात. तुम्ही हा गुंतवणूक पर्याय तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षा कवच म्हणून घेतला तर तुमच्या पत्नीसह तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षिततेचा पर्याय उपलब्ध होईल.
आर्थिक भेटवस्तू देणे का आवश्यक आहे?
सोन्यासारख्या आकर्षक वस्तूऐवजी तुम्ही तुमच्या पत्नीला आर्थिक भेटवस्तू किंवा भेटवस्तू देणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या पत्नीला सांगावे की, या भेटवस्तू तिला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी आणि तिच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आधार म्हणून खूप उपयुक्त ठरतील. ज्या कोणत्याही भौतिक भेटवस्तूंपेक्षा चांगल्या सिद्ध होऊ शकतात.