Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक खात्यासाठी आता 4 नॉमिनी लावता येणार; लोकसभेत बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक सादर!

बँक खातेधारक एकापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त चार नॉमिनी आपल्या बँक खात्यासाठी लावू शकणार आहे. मात्र, त्यासाठी खातेदाराला प्रत्येक नॉमिनीच्या नावासमोर त्या चौघांना ठेव रकमेतून मिळणाऱ्या प्रमाणाची देखील घोषणा करावी लागणार आहे. याबाबत लोकसभेत बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयकाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 09, 2024 | 06:56 PM
बँक खात्यासाठी आता 4 नॉमिनी लावता येणार; लोकसभेत बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक सादर!

बँक खात्यासाठी आता 4 नॉमिनी लावता येणार; लोकसभेत बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक सादर!

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातील बँक खातेदार येत्या काही दिवसांत आपल्या बँक खात्यासाठी चार व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून देऊ शकणार आहे. केंद्रीय या अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी आज (ता.9) लोकसभेत बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले आहे. ज्यामध्ये बँक खातेधारकांना चार जवळच्या व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

काय म्हटलंय या नवीन विधेयकात?

बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक 1949 च्या कलम 45ZA च्या प्रस्तावानुसार, बँक खातेधारक एकापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त चार नॉमिनी आपल्या बँक खात्यासाठी लावू शकणार आहे. मात्र, त्यासाठी खातेदाराला प्रत्येक नॉमिनीच्या नावासमोर त्या चौघांना ठेव रकमेतून मिळणाऱ्या प्रमाणाची देखील घोषणा करावी लागणार आहे. दरम्यान, एखाद्या बँकेत खातेधारकाने जमा केलेली रक्कम मिळण्यास पात्र असण्याच्या अगोदरच नॉमिनी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अशा स्थितीत त्या नॉमिनी व्यक्तीचे नाव रद्द केले जाईल. असे नव्याने संशोधित विधेयकात म्हटले आहे.

हेही वाचा : …सर्व भारतीयांना मिळणार मोठे गिफ्ट; नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्याने ‘ही’ कंपनी पूर्ण करणार वादा!

बँकांमध्ये 78,000 कोटींची बेवारस रक्कम

बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 द्वारे नॉमिनी व्यक्तींची संख्या वाढवण्याचे मुख्य कारण हे बँकांमध्ये जमा असलेली ठेव निनावी असणे हे आहे. मार्च 2024 पर्यंत सुमारे 78,000 कोटी रुपये अशा बँकांमध्ये जमा आहेत. ज्यांचे कोणतेही दावेदार नाहीत. यामुळेच खातेदारांना एकापेक्षा जास्त नॉमिनी नावाचा पर्याय दिला जात आहे. यामुळे हक्क नसलेल्या ठेवींच्या समस्येला सामोरे जाण्यास मदत होईल आणि खात्यात जमा केलेली रक्कम योग्य नॉमिनीला दिली जाऊ शकते.

बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर

नवीन विधेयकातील तरतुदींनुसार, बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955, बँकिंग कंपन्या (अधिग्रहण आणि हस्तांतरण) कायदा 1970 द्वारे आणि बँकिंग कंपन्या (ॲक्विझिशन आणि ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज) कायदा 1980 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. गेल्या आठवड्यात 2 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता त्यास लोकसभेत सादर करण्यात आले आहे.

Web Title: 4 nominees can be made for bank account banking act amendment bill proposed in lok sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 06:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.