Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

48 लाख विवाह, 5.9 लाख कोटींचा व्यापार; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार चालना!

येत्या नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या दोन महिन्यांमध्ये 48 लाख विवाह सोहळ्यांमधून 5.9 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या काळात एकट्या दिल्लीत 4.5 लाख विवाह होणे अपेक्षित आहे. यातून दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 30, 2024 | 04:58 PM
बालविवाह करणं तरूणाला भोवलं; आख्ख्या कुटुंबावरच गुन्हा झाला दाखल

बालविवाह करणं तरूणाला भोवलं; आख्ख्या कुटुंबावरच गुन्हा झाला दाखल

Follow Us
Close
Follow Us:

लग्न मग ते घरचे असो की पाहुण्यांच्या येथील असो लग्न समारंभ हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातच लग्न म्हटले की मोठ्या प्रमाणात खर्च हा आलाच. त्यातून डेकोरेशनसह, फुड क्षेत्रासह अनेक घटकांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. हीच बाब लक्षात घेता येत्या काही दिवसांमध्ये लग्नाचा सीजन सुरु होणार असल्याने, त्यातून मोठी उलाढाल होणार आहे.

दोन महिन्यात 48 लाख विवाह सोहळे 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अर्थात येत्या आठवड्यापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीनंतर लगेचच बिग बँग वेडिंग सीझन सुरू होणार आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अनपेक्षित चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या दोन महिन्यांमध्ये 48 लाख विवाह सोहळ्यांमधून 5.9 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या काळात एकट्या दिल्लीत 4.5 लाख विवाह होणे अपेक्षित आहे. यातून राजधानी दिल्ली परिसरात दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.
(फोटो सौजन्य – istock)

देशभरात 5.9 लाख कोटींच्या व्यवसायाची अपेक्षा 

पुढील महिन्यात १२ नोव्हेंबरपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) केलेल्या अभ्यासानुसार, देशातील किरकोळ क्षेत्र (ज्यात वस्तू आणि सेवा दोन्ही समाविष्ट आहेत) या लग्नाच्या हंगामात 5.9 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे. देशभरात अंदाजे 48 लाख विवाह सोहळ्यांसह, हा हंगाम आर्थिक वाढीचा एक मोठा टप्पा असेल. गेल्या वर्षी 35 लाख विवाहांसह एकूण व्यवसाय 4.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

हे देखील वाचा – …हक्काच्या घराचे स्वप्न धुसर; प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमतीत तब्बल 30 टक्क्यांनी झालीये वाढ!

किती होतो लग्नात खर्च

विवाह प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये होतो. परंतु, प्रत्येकजण समान खर्च करत नाही. काही लग्नांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तर काही ठिकाणी लग्न हे केवळ दोन-तीन लाख रुपयांमध्ये उरकले जातात. सीएआयटी नुसार, यावर्षी बहुतेक लग्नांना 3 ते 15 लाख रुपये खर्च आला आहे. तर जवळपास सात लाख लग्न अशी होती ज्यामध्ये 25 लाख रुपये खर्च केले गेले. याशिवाय 50-50 हजार लग्न अशी होती, ज्यामध्ये 50 लाख रुपये आणि 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला गेला.

लग्न खर्च होणारी प्रमुख क्षेत्रे

– कपडे, साड्या, लेहेंगा आणि पोशाख (10 टक्के)
– दागिने (15 टक्के)
– इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि ग्राहक टिकाऊ वस्तू (5 टक्के)
– सुका मेवा, मिठाई आणि स्नॅक्स (5 टक्के)
– किराणा आणि भाजीपाला (५ टक्के)
– भेट वस्तू (4 टक्के)
– इतर वस्तू (6 टक्के)

सेवा क्षेत्रातही होतो भरपूर खर्च

– बँक्वेट हॉल, हॉटेल्स आणि लग्न स्थळे (5 टक्के)
– इव्हेंट मॅनेजमेंट (5 टक्के)
– मंडप सजावट (12 टक्के)
– खानपान सेवा (10 टक्के)
– फुलांची सजावट (4 टक्के)
– वाहतूक आणि कॅब सेवा (3 टक्के)
– फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी (2 टक्के)
– ऑर्केस्ट्रा आणि बँड (3 टक्के)
– प्रकाश आणि आवाज (3 टक्के)
– इतर सेवा (3 टक्के)

Web Title: 48 lakh marriages spending rs 5 9 lakh crore indian economy will get a boost in november december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 04:57 PM

Topics:  

  • Indian Economy

संबंधित बातम्या

Moody’s Rating: मूडीजचा भारतावर विश्वास कायम, रेटिंग आणि आउटलुक ‘स्थिर’
1

Moody’s Rating: मूडीजचा भारतावर विश्वास कायम, रेटिंग आणि आउटलुक ‘स्थिर’

GST मध्ये करण्यात आली मोठी सुधारणा; आता मिळेल अर्थव्यवस्थेला चालना?
2

GST मध्ये करण्यात आली मोठी सुधारणा; आता मिळेल अर्थव्यवस्थेला चालना?

AI Future India : AI बदलणार भारताची प्रतिमा; 10 वर्षांत GDP मध्ये होणार 44 लाख कोटींची भर, वाचा कसे ते?
3

AI Future India : AI बदलणार भारताची प्रतिमा; 10 वर्षांत GDP मध्ये होणार 44 लाख कोटींची भर, वाचा कसे ते?

India US Trade Deal : भारतीय उद्योगांसाठी सुवर्णकाळ येणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचा ‘Trump Tariff’ वर धाडसी दावा
4

India US Trade Deal : भारतीय उद्योगांसाठी सुवर्णकाळ येणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचा ‘Trump Tariff’ वर धाडसी दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.