Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा रामदेव यांच्यासह ‘हे’ आहे देशातील 5 श्रीमंत आध्यात्मिक गुरु; वाचा… त्यांची संपत्ती?

योग गुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांना जाहिरातीद्वारे दिशाभूल करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता बाबा रामदेव हे पुन्हा चर्चेत आले आहेत. अशातच आता बाबा रामदेव यांच्या एकूण संपत्तीबाबत चर्चा होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण बाबा रामदेव यांच्यासह देशातील ५ श्रीमंत आध्यात्मिक गुरूंच्या संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत...

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 13, 2024 | 07:16 PM
बाबा रामदेव यांच्यासह 'हे' आहे देशातील 5 श्रीमंत आध्यात्मिक गुरु; वाचा... त्यांची संपत्ती?

बाबा रामदेव यांच्यासह 'हे' आहे देशातील 5 श्रीमंत आध्यात्मिक गुरु; वाचा... त्यांची संपत्ती?

Follow Us
Close
Follow Us:

योग गुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांना जाहिरातीद्वारे दिशाभूल करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता बाबा रामदेव हे पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकांना प्रश्न पडला असेल की, योगगुरू बाबा रामदेव यांच्या कमाईचे राज नेमके काय आहे? त्यांची एकूण किती संपत्ती आहे. असा अनेकांना प्रश्न पडला असेल. याशिवाय बाबा रामदेव यांच्यासोबतच देशातील अन्य महत्वाच्या धार्मिक गुरूंची नेमकी संपत्ती नेमकी किती आहे.

कितीये बाबा रामदेव यांची संपत्ती?

बाबा रामदेव देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख आहेत. पतंजली उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केट खुले करून दिले आहे. याशिवाय त्यांची कंपनी खाण्यापिण्यापासून इतर अनेक गोष्टी बनवते. हरियाणातील शेतकरी कुटुंबातील बाबा रामदेव यांना देखील खूप संघर्ष करावा लागला आहे.

हेही वाचा : फर्स्टक्रायची शेअर बाजारात दणक्यात एंट्री; सचिन तेंडुलकर, रतन टाटांनी कमावला बक्कळ नफा!

आज प्रत्येक घरात योग पोहोचवण्यात बाबा रामदेव यांचे मोठे योगदान आहे. ते पतंजली योगपीठ आणि दिव्य योग मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत. बाबा रामदेव यांच्याकडे किती संपत्ती आहे? याचा नेमका आकडा नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 1600 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची संपत्ती?

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे रामकथेसाठी खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे विदेशातही अनेक चाहते आहेत. त्यांनी जगातील अनेक शहरांमध्ये जाऊन प्रवचने आणि गीता पठण केले आहे. धीरेंद्र शास्त्रीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकवेळा ते आपल्या विधानांनी चांगलेच चर्चेत येत असतात. धीरेंद्र शास्त्री हे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असल्याचेही बोलले जाते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, धीरेंद्र शास्त्री यांची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये इतकी आहे.

हेही वाचा : 7 शेअर मोफत, पहिल्यांदाच बोनस देणार ‘ही’ कंपनी; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड!

सद्गुरु जग्गी वासुदेव यांची संपत्ती?

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव योगासाठी खूप प्रसिद्ध आहेत. सद्गुरू जग्गी वासुदेव यांची जगभरात अनेक योग केंद्रे, पर्यावरणीय प्रकल्प आणि शैक्षणिक संस्था आहेत. 2017 मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

माता अमृतानंदमयी यांची संपत्ती?

केरळमध्ये सप्टेंबर 1953 मध्ये जन्मलेल्या माता अमृतानंदमयी या हिंदू आध्यात्मिक नेता आहेत. त्यांना ‘अम्मा’ म्हणूनही ओळखले जाते. अम्मा यांचे देश-विदेशात अनेक अनुयायी आहेत. त्या अमृतानंदमयी ट्रस्टचे कामकाज पाहतात. माता अमृतानंदमयी यांच्या मालमत्तेबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या ट्रस्टची मालमत्ता सुमारे 1500 कोटी रुपये इतकी आहे.

श्री श्री रविशंकर यांची संपत्ती

आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे देखील देशातील महत्वाच्या आध्यात्मिक गुरूंपैकी एक आहेत. ते योग, ध्यान इत्यादींसाठी खूप प्रसिद्ध आहे. जगातील 100 हून अधिक देशांमध्ये त्यांचे अनुयायी आहेत. श्री श्री रविशंकर आपल्या प्रवचनासाठी देश आणि जगभर फिरतात. त्यांच्या फाउंडेशनसाठी अनेक देशांकडून निधी मिळतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची संपत्ती सुमारे 1000 कोटी रुपये इतकी आहे.

Web Title: 5 richest spiritual gurus in the india baba ramdev spiritual gurus new worth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 07:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.