फर्स्टक्रायची शेअर बाजारात दणक्यात एंट्री; सचिन तेंडुलकर, रतन टाटांनी कमावला बक्कळ नफा!
फर्स्टक्राय ब्रँड चालवणाऱ्या मल्टी चॅनेल रिटेल प्लॅटफॉर्म ब्रेनबिझ सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी (ता.१३) शेअर मार्केटमध्ये दणक्यात लिस्टिंग झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) फर्स्टक्रायचा शेअर ६५१ रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. ही किंमत मूळ आयपीओच्या किंमतीपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक आहे. तर, बीएसईवर फर्स्टक्रायचा शेअर ३४.४१ टक्क्यांच्या प्रीमियमसह ६२५ रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला.
शेअरने गाठला ७०७.०५ रुपयांचा उच्चांक
बीएसईवर या शेअरने ७०७.०५ रुपयांचा उच्चांक गाठला. त्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल ५२ टक्के नफा झाला आहे. विशेष म्हणजे या आयपीओच्या माध्यमातून सर्वात मोठे गुंतवणूकदार असलेल्या सचिन तेंडुलकर आणि रतन टाटा यांनीही मोठा नफा कमावला आहे. सचिन तेंडुलकरला या आयपीओतुन 3.35 कोटींचा फायदा झाला आहे. तर रतन टाटा यांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवलेले ६६ लाख रुपये गुंतवणुकीचे, ५ कोटी रुपये झाले आहे.
हेही वाचा : 7 शेअर मोफत, पहिल्यांदाच बोनस देणार ‘ही’ कंपनी; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड!
सचिन तेंडुलकरला 3.35 कोटींचा फायदा
फर्स्टक्राय IPO ची बाजार किंमत पाहता, तो जवळपास 20 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध होणे अपेक्षित होते. या IPO मधून सचिन तेंडुलकरला अंदाजे 3.35 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीत 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी 487.44 रुपयांना 2 लाखांहून अधिक शेअर्स घेतले होते. अशातच आता कंपनीच्या लिस्टिंग किंमतीनुसार त्यांची गुंतवणूक 13.35 कोटी रुपये झाली आहे.
रतन टाटा टाटांना तब्बल 670 टक्के नफा
याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी 2016 मध्ये फर्स्टक्राय कंपनीचे 77,900 इक्विटी शेअर्स 84.72 रुपये दराने खरेदी केले होते. फर्स्टक्रायमध्ये त्यांनी 66 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. तर आता कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर, त्यांच्या शेअर्सची किंमत 5 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यांना तब्बल 670 टक्के नफा झाला आहे. ते सचिन आणि रतन टाटा हे दोघेही त्यांचा शेअर बाजारातील हा नफा आणखी महिनाभर वापरू शकणार नाहीत. सेबीच्या नियमांनुसार, त्यांना सूचीबद्ध झाल्यापासून एक महिना प्रतीक्षा करावी लागेल.
हेही वाचा : शेअर बाजार पुन्हा कोसळला…! 693 अंकांची आपटी, गुंतवणूकदारांचे 4.45 लाख कोटींचे नुकसान!
कंपनीने उभे केले 4194 कोटी रुपये
फर्स्टक्राय ब्रँड चालवणाऱ्या मल्टी चॅनेल रिटेल प्लॅटफॉर्म ब्रेनबिझ सोल्युशन्स लिमिटेडने IPO द्वारे शेअर बाजारातून 4194 कोटी रुपये उभे केले आहेत. यामध्ये 1,666 कोटी रुपयांच्या ताज्या शेअर्स विक्री आणि 2528 कोटी रुपयांच्या विक्रीची ऑफर होती. फर्स्टक्रायच्या IPO ला १२.२२ पट सदस्यत्व मिळाले. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी 19.30 वेळा सदस्यता घेतली. त्याच वेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा (NII) 4.68 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 2.31 पट सदस्यता घेण्यात आला आहे.