आठवी पास व्यक्तीने उभारली 78000 कोटींची कंपनी; ...अनेक कंपन्यांची खरेदीसाठी झुंबड!
आजकाल प्रवासात किंवा अन्य ठिकाणी आपल्याला भूक लागल्यास आपण पटकन हल्दीरामचे एखादे पॅकेट खरेदी करतो. एकेकाळी एका छोट्या दुकानातून सुरू झालेला हा व्यवसाय आज हजारो कोटींचा ब्रँड बनला आहे. मात्र, याच हल्दीरामबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा फूड ब्रँड विकण्याच्या मार्गावर आहे. हल्दीरामला खरेदी करण्याच्या शर्यतीत परदेशी कंपन्यांसह टाटा, पेप्सी या नामांकित कंपन्यांनी देखील रांग लागली आहे.
51 टक्के हिस्सा विक्री होणार
ब्लॅकस्टोन इंक ही अमेरिकी कंपनी हल्दीराममध्ये 78000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह कंपनीतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्यास तयार आहे. यापूर्वी हा करार होण्यास उशीर होण्याचे कारण म्हणजे, ब्लॅकस्टोनला हल्दीराममधील 74 टक्के भागभांडवल खरेदी करायचे होते. मात्र, हल्दीरामचे व्यवस्थापन करणाऱ्या अग्रवाल कुटुंबाला 51 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा विकायचा नव्हता. त्यामुळे आता 51 टक्के हिस्सेदारीसह हा करार झाला, तर देशातील एफएमसीजी क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार ठरणार आहे.
हेही वाचा : कोट्यवधी रुपये कमावले, …तरी नाही भरावा लागणार टॅक्स; भारतातातील ‘हे’ राज्य करमुक्त!
व्यापलंय १३ टक्के भारतीय मार्केट
दरम्यान, एकट्या हल्दीराम या कंपनीने देशातील 13 टक्के स्नॅक्स मार्केट व्यापलेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा करार होण्यापूर्वी हल्दीरामचे तीन भाग एकत्र केले जाणार आहे. अग्रवाल कुटुंब हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या हल्दीराम स्नॅक फूड प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असेल. सध्याच्या घडीला हल्दीराम कंपनीचा व्यवसाय तीन भागात विभागलेला आहे.
40 हून अधिक देशांमध्ये विस्तार
एका छोटेखानी दुकानापासून सुरू झालेली हल्दीराम ही कंपनी आज 78000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हल्दीरामची सुरुवात 1937 मध्ये गंगाभिशन अग्रवाल यांनी केली होती. बिकानेरमध्ये रस्त्याच्या कोपऱ्यावर एका छोट्याशा दुकानात भुजिया विकणाऱ्या गंगाभिशन यांना त्यांची आई लाडाने हल्दीराम म्हणायची. त्यामुळे त्यांनी आपल्या दुकानाचे नाव हल्दीराम भुजियावाला ठेवले. लोकांना त्याच्या भुजियाची चव इतकी आवडली की, हळूहळू त्यांनी कोलकाता, नागपूर या भागांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. हल्दीरामचा व्यवसाय आज 40 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.