Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोन्यातील गुंतवणूकीसाठी नवा पर्याय ! मिरे अ‍ॅसेट म्‍युच्‍युअल फंडकडून गोल्‍ड ईटीएफ फंड ऑफ फंड लाँच

मिरे ॲसेट गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणारा फंड स्कीमचा ओपन-एंडेड फंड आहे.या योजनेत गुंतवणूक केलेले सोने हे ९९.५ टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक शुद्धतेची खात्री देते.

  • By नारायण परब
Updated On: Oct 18, 2024 | 04:48 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

मिरे ॲसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स मिरे ॲसेट गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड सादर केला आहे जो मिरे ॲसेट गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणारा फंड स्कीमचा ओपन-एंडेड फंड आहे. 16 ऑक्टोबर 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी सुरू होणाऱ्या या योजनेचा उद्देश Mirae Asset Gold ETF च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या पोर्टफोलिओमधून दीर्घकालीन भांडवली सेवा प्रदान करणे आहे. ही योजना 22 ऑक्टोबर रोजी बंद होईल आणि 28 ऑक्टोबर 2024 पासून सतत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा उघडली जाईल. रितेश पटेल आणि अक्षय उदेशी या योजनेचे व्यवस्थापन करतील.

हे देखील वाचा-‘मूलमंत्र बचतीचा” , सोप्या पद्धतीने कशी करावी पैशांची गुंतवणूक ? काय सांगतात तज्ज्ज्ञ, जाणून घ्या

९९.५ टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक सोने शुद्धतेची खात्री

स्किममध्‍ये एनएफओदरम्‍यान किमान सुरूवातीची गुंतवणूक रक्‍कम ५,००० रूपये असेल आणि त्‍यानंतर १ रूपयाच्‍या पटीत असेल.
मिरे अ‍ॅसेट गोल्‍ड ईटीएफ फंड ऑफ फंड गुंतवणूकदारांना मिरे अ‍ॅसेट गोल्‍ड ईटीएफमध्‍ये गुंतवणूक करत देशांतर्गत सोन्‍याच्‍या किमती जाणून घेण्‍याचा मार्ग देतो. अविरत ईटीएफला मिळणारे सोने हे लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) द्वारे प्रमाणित आहे, यामधून ९९.५ टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक शुद्धतेची खात्री मिळते. कमी खर्च, कोणतेही स्‍टोरेज नाही आणि शुद्धता जोखीम हे गुंतवणूकीच्‍या उद्देशाने प्रत्‍यक्ष सोने खरेदी करण्‍याच्‍या तुलनेत या स्कीममध्‍ये गुंतवणूक करण्‍याचे अतिरिक्‍त फायदे आहेत.

सोन्‍याकडे सुरक्षित मालमत्ता म्‍हणून पाहिले जाते, जे इतर मालमत्तावर्गांसोबतच्‍या कमी सहसंबंधामुळे विविध फायदे देते, तसेच सोने हे  बाजारपेठ जोखीमेच्या आणि महागाईच्‍या काळात चांगली गुंतवणूक मानली जाते. मिरे अ‍ॅसेट गोल्‍ड ईटीएफ फंड ऑफ फंडमध्‍ये गुंतवणूक करत गुंतवणूकदार अशा आर्थिक अनिश्‍चिततेच्‍या कालावधींमध्‍ये त्‍यांच्‍या पोर्टफोलिओची स्थिरता वाढवू शकतात.

हे देखील वाचा-PM Kisan Nidhi: या 5 कारणांमुळे अजूनही बँक अकाउंटमध्ये 18’वा हप्ता जमा झाला नाही, यावर उपाय काय? जाणून घ्या

या फंडाद्वारे गुंतवणूकदारांना त्‍यांचे पोर्टफोलिओ प्रबळ करण्‍याची संधी

एनएफओ लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत मिरे अ‍ॅसेट इन्‍व्‍हेस्‍टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रा. लि.च्‍या ईटीएफ प्रॉडक्‍टचे प्रमुख व फंड मॅनेजर सिद्धार्थ श्रीवास्‍तव म्‍हणाले, ”मिरे अ‍ॅसेट गोल्‍ड ईटीएफ फंड ऑफ फंड गुंतवणूकदारांना त्‍यांच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये विविधता आणण्‍यास आणि सोन्‍यामधून फायदा मिळवण्‍यास साधा, पण प्रभावी मार्ग देतो. महागाई व आर्थिक मंदीच्‍या काळात मूल्‍य जतन करण्‍याची आणि दीर्घकाळापर्यंत संपत्ती निर्माता म्‍हणून सोन्‍याच्‍या क्षमतेसह या फंडाचा गुंतवणूकदारांना त्‍यांचे पोर्टफोलिओ प्रबळ करण्‍याची आणि आव्‍हानात्‍मक काळामधून नेव्हिगेट करण्‍याची संधी देण्‍याचा मनसुबा आहे.”

Web Title: A new option for investment in gold gold etf fund of funds launched by mirae asset mutual fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 04:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.