प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारची विशेष योजना आहे. याअंतर्गत सर्व शेतकरी कुटुंबियांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपयांचा निधी मदत म्हणून दिला जातो. पीएम किसान सन्मान निधीचा 18’वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज झाला. देशभरातील 9.40 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली, परंतु असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा 18’वा अजूनही हप्ता पोहोचलेला नाही.
जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये अजूनही पैसे आले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. यामागे मुख्य 5 कारणे असू शकतात. 2000 रुपयांचा 18’वा हप्ता न मिळाल्यास तक्रार कुठे नोंदवता येईल ते आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगत आहोत.
हेदेखील वाचा – पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सची यशोगाथा; फुटपाथवर बसून विकले जायचे दागिने
अशी करा तक्रार
किसान सन्मान निधीचा हप्ता रखडली असेल, तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या 011-23381092 या टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही Pmkisan-ict@Gov.in या ईमेलद्वारे तुमच्या समस्येचे निराकरण देखील करू शकता. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान ई-मित्र चॅटबॉट देखील सुरू करण्यात आले आहे, जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात.
या 5 कारणांमुळे थांबू शकतो निधी
हेदेखील वाचा – भारताने वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्माण केला दबदबा, देशाची वस्त्र निर्यातीमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ
समस्येचे निराकरण करण्यासाठी अशी चेक करा समस्या