Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय… या शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा… सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने आज कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची (एआयएफ) व्याप्ती वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ज्यामुळे आता या योजनेचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांसोबत लहान शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 28, 2024 | 05:59 PM
मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय... या शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा... सविस्तर

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय... या शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा... सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.२८) केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज झालेल्या बैठकीतील शेतकऱ्यांसाठीचे महत्वाचे मुद्दे

– कृषी पायाभूत सुविधा निधीत 1 लाख कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत सरकार पीक काढणीनंतरच्या कामावर भर देणार आहे.
– ॲग्री इन्फ्रा फंडाच्या पैशातून एकात्मिक पॅक हाऊस बांधले जाणार आहे.
– शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज विकसित केले जाणार आहे.
– शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटेड वाहने उपलब्ध केली जाणार आहे.
– शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट स्थापन केले जाणार आहे.
– विशेष म्हणजे पीएम कुसम योजनेंतर्गत सोलर प्लांटमधून या ग्रीडला वीज विक्री करता येणार आहे. असेही सरकारने म्हटले आहे. अशा परिस्थितीत प्लांट उभारण्यासाठी ॲग्री इन्फ्रा फंडातून निधी उपलब्ध होणार आहे.
– या योजनेच्या माध्यमातून फळे उत्पादक शेतकरी काढणीनंतर साठवणुकीसाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी प्लांट उभारू शकणार आहे. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा – 14 नवीन रेल्वे स्टेशन्स, 1300 गावे रेल्वेने जोडली जाणार; 6456 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजूरी

काय आहे या योजनेचा उद्देश

देशातील कृषी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती वाढवणे देखील समाविष्ट आहे. या उपक्रमांचे उद्दिष्ट अॅग्रीकल्चर इन्फास्ट्रचर फंड (एआयएफ) योजनेंतर्गत प्रकल्पांची व्याप्ती वाढवणे आणि मजबूत कृषी पायाभूत सुविधा साखळीला चालना देण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक उपायांचे एकत्रीकरण करणे आहे. हा यामागील उद्देश आहे.

छोट्या शेतकऱ्यांनाही मिळणार योजनेचा लाभ

अॅग्रीकल्चर इन्फास्ट्रचर फंड (एआयएफ) योजनेची व्याप्ती वाढल्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची वाढ, उत्पादकतेत सुधारणा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि एकूणच शाश्वत कृषी संकल्पनेला मदत होणार आहे. विशेष म्हणजे या उपायांमुळे देशातील कृषी पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाद्वारे कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी सरकारची कटिबद्ध असल्याचे अधोरेखित होते. सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या शेतकऱ्यांना देखील या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Web Title: Agri infra fund increased central government will give money to farmers for small processing plants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 05:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.