इंडिगोकडून प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर; आता बसच्या तिकिटामध्ये जाता येणार परदेशात!
देशातील विद्यार्थ्यांना स्वस्त दरात विमान प्रवास करता येणार आहे. भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. एअरलाइन्सच्या ‘स्टुडंट स्पेशल’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अधिक परवडणारा आणि सोपा करण्यात आला आहे. अधिक किफायतशीर हवाई सेवेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इंडिगो वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे बुकिंग करावे लागेल. सध्या ही सुविधा केवळ इंडिगो वेबसाइट आणि ॲपवर उपलब्ध आहे.
काय आहे या कार्यक्रमाचा उद्देश?
इंडिगोचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. यामध्ये प्रवास खर्च कमी करणे आणि आराम याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये फेरफार शुल्क लागू होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यांच्या फ्लाइटचे वेळापत्रक बदलू शकतात. इंडिगोला विश्वास आहे की, या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि प्रवासाची व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यास मदत होईल.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हे देखील वाचा – विधानसभा निकालाचा शेअर बाजारावर होणार परिणाम, वाचा… मार्केटमध्ये काय हालचाली होणार?
‘विद्यार्थी विशेष’ कार्यक्रमासाठी काय आहे पात्रता?
‘विद्यार्थी विशेष’ कार्यक्रमाचा लाभ केवळ तेच विद्यार्थी घेऊ शकतात. ज्यांचे वय किमान 12 वर्षे असावे आणि तिकिट बुकिंगच्या वेळी त्यांच्याकडे वैध विद्यार्थी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवासाचा खर्च कमी करणे तसेच त्यांच्या शिक्षणासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा इंडिगोचा उद्देश आहे.
हे देखील वाचा – पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 6 आयपीओ उघडणार, 4 शेअर्सचे हाेणार लिस्टिंग!
काय म्हटलंय कंपनीने उपक्रमाबाबत
हेड ऑफ ग्लोबल सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा म्हणाले आहे की, “आम्ही विद्यार्थ्यांच्या अनोख्या गरजांबद्दल सतर्क आहोत. त्यानुसार आम्ही ‘स्टुडंट स्पेशल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. जो विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासात अधिक सुविधा देतो. आम्ही विद्यार्थ्यांचा विमान प्रवास सुलभ आणि त्रासमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत.
इंडिगो ही भारत देशामधील एक कमी दराने विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे असून मे २०१४ रोजी भारतामधील एकूण हवाई प्रवासी वाहतूकीचा ३२.३ टक्के इतका वाटा इंडिगोचा होता. ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. रोज ५३४ उड्डाणांद्वारे ३६ विमानताळांवर या कंपनीची ए-३२० प्रकारची ८४ विमाने ये-जा करतात.