फोटो सौजन्य- iStock
शुक्रवारी (ता.२४) शेअर बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढला आहे. त्याचबरोबर आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पुढील आठवड्यातही 6 नवीन आयपीओ उघडणार आहेत. तर एनटीपीसी ग्रीन एनर्जीसह 4 आयपीओंचे लिस्टिंग हाेणार आहे. पुढील आठवड्यात सुरू होणारे सर्व 6 आयपीओ एसएमई विभागातील आहेत.
हे आयपीओ उघडणार
1. राजेश पॉवर सर्व्हिसेस
या आयपीओचा आकार 160.47 कोटी रुपये आहे. कंपनी 93.47 कोटी रुपयांचे 27.9 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. तर 67 कोटी रुपयांचे 20 लाख शेअर्स ऑफर फाॅर सेल अंतर्गत जारी केले जातील. 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत तुम्ही या आयपीओमध्ये बोली लावू शकाल. शेअर्सचे लिस्टिंग 2 डिसेंबर रोजी हाेणार आहे. किंमत प्रति शेअर 319 रुपये ते 335 रुपये आहे. एका लॉटमध्ये 400 शेअर्स आहेत. यासाठी 1.34 लाख रुपये गुंतवावे लागतील.
2. राजपुताना बायोडिझेल
या आयपीओचा आकार 24.70 कोटी रुपये आहे. कंपनी 19 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. हा आयपी 26 नोव्हेंबरला उघडेल आणि 28 नोव्हेंबरला बंद होईल. शेअर्सचे लिस्टिंग 3 डिसेंबर रोजी होऊ शकते. किंमत बँड 123 रुपये ते 130 रुपये आहे. एका लॉटमध्ये एक हजार शेअर्स आहेत. यासाठी 1.30 लाख रुपये गुंतवावे लागतील.
3. एपेक्स इकोटेक लिमिटेड
या आयपीओचा आकार 25.54 कोटी रुपये आहे. कंपनी 34.99 लाख नवीन शेअर्स जारी करेल. हा आयपीओ 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान खुला असेल. शेअर्स 4 डिसेंबर रोजी सूचीबद्ध हाेणार आहेत. किंमत प्रति शेअर 71 रुपये ते 73 रुपये आहे. एका लॉटमध्ये 1600 शेअर्स आहेत. यासाठी 1,16,800 रुपये गुंतवावे लागतील.
4. आभा पॉवर अँड स्टील लिमिटेड
या आयपीओचा आकार 38.54 कोटी रुपये आहे. कंपनी 31.04 कोटी रुपयांचे 41.39 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. तर 7.50 कोटी रुपयांचे 10 लाख शेअर्स ऑफर फाॅर सेल अंतर्गत जारी केले जातील. आयपीओमध्ये 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान तुम्ही बोली लावू शकाल. लिस्टिंग 4 डिसेंबर रोजी होऊ शकते. किंमत बँड 75 रुपये प्रति शेअर आहे. एका लॉटमध्ये 1600 शेअर्स आहेत. यासाठी 1.20 लाख रुपये गुंतवावे लागतील.
5. अग्रवाल टफनेड ग्लास इंडिया लि.
या आयपीओचा आकार 62.64 कोटी रुपये आहे. कंपनी 58 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत तुम्ही या आयपीओमध्ये बोली लावू शकाल. 5 डिसेंबरला लिस्टिंग होऊ शकते. किंमत बँड105 रुपये ते 108 रुपये आहे. एका लॉटमध्ये 1200 शेअर्स आहेत. यासाठी 1,29,600 रुपये गुंतवावे लागतील.
6. गणेश इन्फ्रावर्ल्ड लिमिटेड
या कंपनीच्या आयपीओचा आकार 98.58 कोटी रुपये आहे. कंपनी 1.19 कोटी नवीन शेअर्स जारी करणार आहे. तुम्ही 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत या आयपीओमध्ये बोली लावू शकाल. लिस्टिंग 6 डिसेंबरला होऊ शकते. किंमत बँड 78 रुपये ते 83 रुपये आहे. एका लॉटमध्ये 1600 शेअर्स आहेत. यासाठी 1,32,800 रुपये गुंतवावे लागतील.
हे आयपीओ हाेणार सूचीबद्ध
पुढील आठवड्यात चार आयपीओचे लिस्टिंग होणार आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओचे लिस्टिंग 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेडच्या आयपीओचे लिस्टिंग 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे. एसएमई विभागातील लामोसेक इंडिया लिमिटेड आणि सी2सी एडवांस्ड सिस्टम्स लिमिटेडचा आयपीओ 29 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध होणार आहे.