...सर्व भारतीयांना मिळणार मोठे गिफ्ट; नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्याने 'ही' कंपनी पूर्ण करणार वादा!
अमेरिकन स्टार्टअप कंपनी ऍटलिझने भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राबाबत मोठी घोषणा केली होती. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नीरजने पदक जिंकल्यास, भारतीयांना मोफत व्हिसा दिला जाईल. असे ऍटलिझचे संस्थापक आणि सीईओ मोहक नाहाटा यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने चमकदार कामगिरी करत, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्यामुळे आता मोहक नाहाटा यांनी आपला शब्द पाळला आहे. ते सर्व भारतीयांना मोफत व्हिसा देणार आहे.
काय म्हटलंय कंपनीने आपल्या घोषणेबाबत?
अमेरिकन स्टार्टअप कंपनी ऍटलिझचे संस्थापक आणि सीईओ मोहक नाहाटा यांनी लिंक्डइनवर पोस्ट करत म्हटले होते की, भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकल्यास, मी कंपनीतर्फे भारतीयांना मोफत व्हिसा देण्याबाबत शब्द दिला होता. कंपनी हा शब्द पाळणार आहे. पण आज मला सांगायचे आहे की, पदकाचा रंग महत्वाचा नसून, भावना देखील महत्त्वाची असते. या उपक्रमामुळे नीरजच्या कामगिरीचा आनंदच नाही तर राष्ट्रीय अभिमान आणि एकता वाढण्यास देखील मदत होणार आहे.
हेही वाचा : शेअर बाजारातील चमक परतली; सेन्सेक्स 820 तर निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह बंद!
काय आहे कंपनीची ऑफर?
जगभरातील कोणत्याही देशासाठी मोफत व्हिसा मोफत असेल, पण तो फक्त एका दिवसासाठी असणार आहे. या भन्नाट ऑफरच्या घोषणेनंतर, ऍटलिझ कंपनीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्यांची संख्या १२४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे. या घोषणेमुळे कंपनीच्या वापरकर्त्यांची संख्या दुप्पट झाली आहे.
सेवा शुल्कही केले माफ
ऍटलिझ कंपनीने सांगितले की, सर्व्हिस चार्ज आणि व्हिसाचा खर्च दोन्ही भरावे लागतात. परंतु हे दोन्ही शुल्क सर्व भारतीयांसाठी माफ करण्यात आले आहे. भारतीयांना कोणतेही पैसे न देता व्हिसासाठी अर्ज करण्याची परवानगी कंपनीकडून असणार आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकमध्ये ८९.४५ मीटर अंतर कापून, रौप्यपदक जिंकले. दुसरीकडे, पाकिस्तानी भालाफेकपटू अरश नदीमने गुरुवारी (ता.८) फायनलमध्ये 92.97 मीटर अंतर कापून, ऑलिम्पिक विक्रम मोडून जगाला अचंबित केले.