'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत
गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. आजही (ता.९) जागतिक बाजारातील संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. आज शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जबरदस्त उसळीसह बंद झाला आहे. बाजारातील ही वाढ प्रामुख्याने आयटी, ऊर्जा आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे दिसून आली आहे.
सेन्सेक्समध्ये 820 तर निफ्टीमध्ये 250 अंकांची वाढ
दरम्यान, अमेरिकेतील मंदीचा धोका टळताना दिसत आहे, त्यामुळे बाजारात ही वाढ दिसून आली आहे. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा ( बीएसई) सेन्सेक्स 820 अंकांच्या वाढीसह 79,706 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह 24,367 अंकांवर बंद झाला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
(फोटो सौजन्य : istock)
या शेअर्समध्ये तुफान तेजी
आज शेअर बाजार सुरु असताना, आजच्या व्यवहारादरम्यान, टाटाचा ट्रेंट शेअर्स 11.18 टक्के किंवा 631 रुपयांच्या वाढीसह 6275 रुपयांच्या आजीवन उच्चांकावर बंद झाला. याशिवाय आयशर मोटर्स ५.५४ टक्के, ओरॅकल फिन सर्व्हिसेस ५ टक्के, इन्फोएज ४.३७ टक्के, एमसीएक्स इंडिया ३.९२ टक्के, सन टीव्ही नेटवर्क ३.६८ टक्के, कॅनरा बँक ३.२७ टक्के वाढीसह बंद झाले. याशिवाय लुपिन, ओएनजीसी, श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून आली.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)