Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबानी-अदानी IPL मध्ये आमने-सामने भिडणार; अदानी समूह ‘या’ टीमचा सर्वाधिक हिस्सा करणार खरेदी!

अंबानी समूहानंतर आता अदानी समूहदेखील आयपीएलमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. खाजगी इक्विटी फर्म सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स, गुजरात टायटन्स संघातील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. याबाबत अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता उद्योग जगतातील दोन धुरंदर क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 19, 2024 | 08:53 PM
अंबानी-अदानी IPL मध्ये आमने-सामने भिडणार; अदानी समूह 'या' टीमचा सर्वाधिक हिस्सा करणार खरेदी!

अंबानी-अदानी IPL मध्ये आमने-सामने भिडणार; अदानी समूह 'या' टीमचा सर्वाधिक हिस्सा करणार खरेदी!

Follow Us
Close
Follow Us:

अंबानी आणि अदानी समूह हे देशातील प्रमुख उद्योग समूह आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही समूहांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, आता मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोघेही एकमेकांसोबत भिडणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या दोघांमध्ये नेमकी असे काय होणार आहे. ज्यात हे दोघेही आमने-सामने येणार आहेत.

‘या’ संघाचा मोठा हिस्सा खरेदी करणार

मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाने आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचा हिस्सा खरेदी करणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीसह अंबानी समूह आधीच आयपीएलमध्ये आहे. तर आता गुजरात टायटन्सचा हिस्सा खरेदी करार पूर्ण झाल्यास, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात थेट सामना होणार आहे.

कधीपर्यंत होईल करार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन IPL संघांना फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांचे स्टेक विकण्यास मनाई केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2025 मध्ये बंदी उठल्यानंतर हा करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन वर्षे जुन्या गुजरात टायटन्स फ्रँचायझीचे मूल्य 1 अब्ज ते 1.5 बिलियन डॉलर दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. 2021 मध्ये सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सने ही फ्रँचायझी 5,625 कोटी (745 दशलक्ष डॉलर) मध्ये खरेदी केली होती.

2021 मध्ये गुजरात टायटन्स संघ खरेदी करण्याची संधी गमावल्यानंतर, अदानी आणि टोरेंट समूह गुजरात टायटन्समधील मोठा हिस्सा खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, नफा कमावल्यानंतर सीव्हीसीलाही आपला हिस्सा विकायचा आहे. मात्र, या तिघांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, सीव्हीसी ही क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करणारी मोठी कंपनी आहे.

गुजरात टायटन्स-नीता अंबानी ‘शत्रू’?

आयपीएलमध्ये प्रवेश केल्यानंतर गुजरात टायटन्सने संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. याआधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात विजेतेपद पटकावले होते. यानंतर नीता अंबानी यांच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्याला परत बोलावून, मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवले. आता तोच संघ विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी ग्रुप सामील झाला आहे.

Web Title: Ambani adani in ipl adani group buy the largest share of gujarat titans team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 08:52 PM

Topics:  

  • Adani Group
  • Ambani Group
  • IPL 2025

संबंधित बातम्या

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक
1

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 
2

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 

Adani Power: PM Modi यांचा एक इशारा आणि बांग्लादेशात होईल अंधारमय; भारताविरुद्ध विष ओकले तर भोगावे लागतील ‘असे’ परिणाम
3

Adani Power: PM Modi यांचा एक इशारा आणि बांग्लादेशात होईल अंधारमय; भारताविरुद्ध विष ओकले तर भोगावे लागतील ‘असे’ परिणाम

India–Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधात तणाव; बांगलादेश भारतावर कशासाठी अवलंबून आहे?
4

India–Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधात तणाव; बांगलादेश भारतावर कशासाठी अवलंबून आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.