
AM/NS इंडियाचा FY 2024-25 'सस्टेनिबिलिटी रिपोर्ट' प्रकाशित (Photo Credit - X)
मुंबई नोव्हेंबर: आर्सेलॉरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS इंडिया) ह्यांनी FY 2024-25 साठी त्यांचा सस्टेनिबिलिटी रिपोर्ट प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये त्यांनी डीकार्बनायझेशन, सर्क्युलॅरिटी आणि कम्युनिटीज्च्या सक्षमीकरणाच्या संदर्भातील त्यांच्या बांधिलकीच्या संबंधात ते करत असलेल्या मोजता येण्यासारख्या प्रगतीचा उल्लेख केलेला आहे.
हा रिपोर्ट हे देखील अधोरेखित करतो की AM/NS इंडियाचे CO2 एमिशन्स घटवण्याचे आणि सर्क्युलॅरिटी स्वीकारण्याचे प्रयत्न हे ‘ग्लोबल रिपोर्टिंग इनिशिएटिव(GRI) 2021’ युरोपियन सस्टेनिबिलिटी रिपोटिंग स्टँडर्ड्स (ESRS)’, ‘इंटिग्रेटेड रिपोर्टिंग (IR)’ आणि ‘बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनिबिलिटी रिपोर्टिंग (BRSR)’ अशा जागतिक मानकांशी सुसंगत आहेत.
श्री. दिलिप उम्मेन, चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर, आर्सेलॉरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS इंडिया), म्हणाले की: ‘‘सस्टेनिबिलिटी ही नावीन्याला प्रोत्साहन देणे, देशाच्या हवामान कृती लक्ष्यांमध्ये योगदान देणे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे तसेच अन्य सर्व भागधारकांच्या कल्याणाची व सुरक्षिततेची खात्री मिळवणे, ह्या आमच्या बिझनेस धोरणाचा अविभाज्य भाग आहे. उच्च प्रतीचे आणि लो-कार्बन एमिशन्स स्टील निर्माण करणे, अधिक जबाबदारीने सुरू ठेवण्याच्या आमच्या धोरणात्मक उद्दिष्टामध्ये सुस्थिर प्रगती केल्यामुळे गेल्या वित्तीय वर्षामध्ये आम्ही आमच्या सस्टेनिबिलिटिच्या वाटचालीमध्ये महत्वाचा टप्पा गाठला आहे. हिरव्या/हरित वचनाकडून हिरव्या/हरित कृतीकडे ह्या थीममध्ये,हा रिपोर्ट आपली परिचालने, मूल्य शृंखला आणि समुदायांमधील सस्टेनिबिलिटीमध्ये आपण केलेल्या मोजता येणाऱ्या प्रगतीचे तपशील दाखवतो.
LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा
परिचालनातील महत्वाचे टप्पे
हा रिपोर्ट, कंपनी पुढील पिढीच्या स्टीलमेकिंगसाठी ग्रीन हायड्रोजन आणि कार्बन कॅप्चर करून मार्ग कसा खुला करत आहे, हे तपशीलवार दर्शवतो. AM/NS इंडियाने आर्सेलॉरमित्तलच्या Xकार्ब™ इंडिया ॲक्सीलेटर प्रोग्रॅम (ज्यामध्ये आयआयटी मद्रासचा देखील सहभाग होता) सोबत सहयोग साधला आणि डीकार्बनायझेशन टेक्नॉलॉजीज् वर लक्ष केंद्रित केलेल्या 50 स्टार्ट अप्स बरोबर इंटरॲक्ट केले. ह्यापैकी तीन कंपन्यांना आर्सेलॉरमित्तलने सुपर इनोव्हेशनसाठी सीड फंडिंग बहाल केले.
सीएसआर उपक्रम