फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क कसे राहावे? Angel One सांगितली 'ही' महत्वाची गोष्ट
फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी, एंजेल वन लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना फसव्या सोशल मीडिया गटांविषयी सतर्क केले आहे. हे गट कंपनीच्या नावाचा आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावा आणि प्रतिमांचा गैरवापर करून, फसव्या दाव्यांसह अनधिकृत गुंतवणूक योजनांचे प्रचार करत आहेत. एंजेल वनने विशेषतः व्हॉट्सॲप आणि टेलीग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अशा गटांचा प्रसार लक्षात घेतला आहे, जेथे लोकांना एंजेल वनशी संबंधित असल्याचा खोटा दावा करून सल्ला दिला जात आहे.
PM Kisan Yojana: लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 2000 रूपयांचा19 वा हफ्ता
कंपनीने स्पष्ट केले आहे की, सिक्युरिटीजशी संबंधित सल्ला किंवा शिफारसी SEBI (सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) च्या नोंदणी/परवानगीशिवाय देणे बेकायदेशीर आहे. तसेच, SEBI च्या मंजुरीशिवाय सिक्युरिटीजशी संबंधित परताव्याचे अनधिकृत दावे करणे देखील कायद्याने निषिद्ध आहे. या गटांचा मुख्य हेतू म्हणजे सामान्य लोकांना आकर्षित करून त्यांच्याकडून पैसे गोळा करणे. एंजेल वनने त्यांच्या गुंतवणूकदारांना सूचित केले आहे की, या गटांमध्ये सामील होणे किंवा त्यांचे सल्ले स्वीकारणे धोकादायक ठरू शकते.
कंपनीने जोर दिला आहे की, एंजेल वन लिमिटेडची कोणतीही अधिकृत नोंदणी न करता किंवा अनुमती न घेता गुंतवणूक संबंधित सल्ला किंवा माहिती देणे कायद्यानुसार योग्य नाही. व्हॉट्सॲप, टेलीग्राम किंवा अन्य कोणत्याही मेसेजिंग प्लेटफॉर्मवर असलेले गट कंपनीच्या अधिकृत व्यवसायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. या गटांचे इन्कलूडेड किंवा सल्ला घेतल्यास, गुंतवणूकदारांना गंभीर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
एंजेल वनने आपल्या गुंतवणूकदारांना योग्य ती माहिती मिळवण्यासाठी अधिकृत स्त्रोतांवर आधारित निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, फसव्या ॲप्लिकेशन्स, वेब लिंक्स किंवा गटांशी त्यांचा कोणताही संबंध नाही. याशिवाय, कंपनी केवळ अधिकृत प्लॅटफॉर्मवरच व्यवसाय करते आणि कोणतीही संवेदनशील माहिती कधीही अनधिकृत चॅनेलद्वारे मागत नाही. गुंतवणूकदारांना योग्य सल्ला मिळवण्यासाठी आणि सुरक्षित व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एंजेल वन वचनबद्ध आहे. गुंतवणूकदारांना हे सांगण्यात आले आहे की, त्यांनी अशा संस्थांपासून दूर राहावे आणि कोणत्याही संशयास्पद घटनेची माहिती त्वरित संबंधित कायदेशीर यंत्रणांना द्यावी.
जर कोणत्याही प्रकारचा घोटाळा आढळला, तर तो सायबर क्राईम पोर्टल (cybercrime.gov.in) किंवा 1930 या हेल्पलाइनवर नोंदवू शकता, तसेच आपल्या नजिकच्या पोलीस स्टेशनला देखील संपर्क करू शकता.
अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी एंजेल वनने सर्व गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ही सतर्कता आपल्याला आर्थिक धोके टाळण्यास मदत करू शकते.