पीएम किसान योजनेचा १९ वा हफ्ता कधी मिळणार (फोटो सौजन्य - Instagram)
केंद्र सरकार लवकरच पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक हप्त्यात, सरकार प्रत्येकी २००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते.
आतापर्यंत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हप्त्यांद्वारे आर्थिक मदत पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता जारी केला होता. पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता कधी जारी होईल आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची माहिती आम्ही या लेखातून देत आहोत (फोटो सौजन्य – iStock)
19 वा हफ्ता कधी?
केंद्र सरकार दर चार महिन्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता देत असते. शेवटचा हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये आला होता. त्यानुसार, योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. तथापि, सरकारने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही हा केवळ अंदाज लावण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकरी हा हफ्ता नक्की कधी मिळणार याच्या प्रतिक्षेत आहेत. या पीएम किसान योजनेच्या हफ्त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक फायदे होत असल्याचे दिसून येत आहे आणि यासाठी शेतकरी अत्यंत सोप्या पद्धतीने आपले नावही नोंदवू शकतात आणि ही प्रक्रिया ऑनलाईन अथवा ऑफलाईन दोन्ही प्रकाराने शेतकऱ्यांना करता येऊ शकते
‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; ‘ही’ प्रक्रिया पुर्ण कराच!
कोणाला लाभ नाही मिळणार?
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी, म्हणजेच जमिनीच्या मालकीची पडताळणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पडताळणी केलेली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी अधिकारी शेतकऱ्यांना सतत जागरूक करत आहेत की त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी करून घ्यावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे, अन्यथा कोणत्याही शेतकऱ्याला याचा फायदा घेता येणार नाही. यासाठी आधार कार्डाशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे
पीएम किसान योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; 19 व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे काय फायदे आहेत?