Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिल अंबानींचे दिवस पालटले, दोन दिवसांत दोन गोड बातम्या… ‘या’ दोन कंपन्यांनी केली कमाल!

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडनेही दमदार कामगिरी केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 4,082.53 कोटी रुपये राहिला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 15, 2024 | 09:27 PM
अनिल अंबानींचे दिवस पालटले, दोन दिवसांत दोन गोड बातम्या... 'या' दोन कंपन्यांनी केली कमाल!

अनिल अंबानींचे दिवस पालटले, दोन दिवसांत दोन गोड बातम्या... 'या' दोन कंपन्यांनी केली कमाल!

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे बंधू अन‍िल अंबानी गेल्या काही वर्षांपासून अडचणीत होते. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. परंतु आता त्यांचे नशीब पालटले आहे. अनिल अंबानी यांच्या मुलांनी कमाल केली आहे. यामुळे तोट्यात असणाऱ्या त्यांच्या कंपन्या फायद्यात येत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीला दुसऱ्या तिमाहीत फायदा झाला आहे. 2878 कोटी रुपये फायद्यात ही कंपनी आली आहे.

दुसरी चांगली बातमी समोर

अशातच आता अनिल अंबानी यांच्यासाठी दुसरी चांगली बातमी आली आहे. त्यांच्या रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडनेही दमदार कामगिरी केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 4,082.53 कोटी रुपये राहिला आहे. या कंपनीची जबाबदारी अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी सांभाळत आहे.
(फोटो सौजन्य – canva)

हे देखील वाचा – धोनीच्या सन्मानासाठी आरबीआय काढणार 7 रुपयांचे नाणे? वाचा… काय आहे व्हायरल दाव्याची सत्यता!

रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडला मागील वर्षी या महिन्यात तोटा झाला होता. ही कंपनी 294.04 कोटी रुपये तोट्यात होती. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कर्जाची परतफेड आणि कर्ज सेटलमेंटमुळे कंपनीचा फायदा वाढला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न किरकोळ घसरले आहे. ते 7,345.96 कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच तिमाहीत 7,373.49 कोटी रुपये होते.

कंपनीचा खर्चही झाला कमी

कंपनीचा खर्च सप्टेंबरच्या तिमाहीत कमी झाला आहे. तो आता 6,450.38 कोटी रुपये राहिला आहे. मागील वर्षी हा खर्च 7,100.66 कोटी रुपये होता. रिलायन्स इंफ्रा कंपनी वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये सेवा देते. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

हे देखील वाचा – गाड्यांंच्या किंमती कमी होणार? केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांचा वाहन उद्योगाला मोलाचा सल्ला, वाचा… सविस्तर!

रिलायन्स पॉवरची दमदार कामगिरी

रिलायन्स पॉवरची कामगिरी चांगली होत आहे. या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा या कंपनीचा नफा वाढला आहे. यापूर्वी ही कंपनी तोट्यात होती. परंतु आता ती फायद्यात आली आहे. जुलै- सप्टेंबर तिमाहीत या कंपनीला 237.76 रुपये तोटा होता. आता मात्र कंपनी फायद्यात आली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा इंटीग्रेटेड नेट प्रॉफ‍िट 2,878.15 कोटी रुपये राहिला आहे.

अनिल अंबानी यांची मुले जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी यांनी उद्योगात लक्ष घातले आहे. त्यानंतर अनिल अंबानी यांच्या कंपन्यांची परिस्थिती चांगली होत आहे. धाडसी निर्णय, संघर्षाचा सामना करत त्यांनी कंपनीला नफ्यात आणले आहे.

Web Title: Anil ambani company in profit reliance infra in profit after reliance power company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 09:27 PM

Topics:  

  • anil ambani
  • Reliance Power

संबंधित बातम्या

कठीण काळात अनिल अंबानीची लागली लॉटरी, बँक खात्यात येणार रू. 1000000000, विदेशात झाली तगडी ‘डील’
1

कठीण काळात अनिल अंबानीची लागली लॉटरी, बँक खात्यात येणार रू. 1000000000, विदेशात झाली तगडी ‘डील’

२,७९६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार…! अनिल अंबानी आणि राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, CBI ने न्यायालयात दाखल केले आरोपपत्र
2

२,७९६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार…! अनिल अंबानी आणि राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, CBI ने न्यायालयात दाखल केले आरोपपत्र

Anil Ambani: मोठी बातमी! ED ने अनिल अंबानींविरूद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; काय आहे प्रकरण?
3

Anil Ambani: मोठी बातमी! ED ने अनिल अंबानींविरूद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; काय आहे प्रकरण?

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या, CBI ने दाखल केला फौजदारी खटला, कंपन्यांचे शेअर्स कोसळले
4

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या, CBI ने दाखल केला फौजदारी खटला, कंपन्यांचे शेअर्स कोसळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.