Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ एक घोषणा… अन् अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांनी उसळी!

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर या दोन्ही कंपन्यांचे समभाग 5 टक्क्यांनी उसळी घेतल्यानंतर अप्पर सर्किटला आले आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 23, 2024 | 04:16 PM
अनिल अंबानींसाठी आणखी एक संकट; सेबीने 'या' कंपनीवर केली मोठी कारवाई!

अनिल अंबानींसाठी आणखी एक संकट; सेबीने 'या' कंपनीवर केली मोठी कारवाई!

Follow Us
Close
Follow Us:

मंगळवारी (ता.22) अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने घोषणा केली आहे की, त्यांची उपकंपनी रिलायन्स डिफेन्स लिमिटेड दारूगोळा आणि लहान शस्त्रे तयार करणार आहे. ज्याचा थेट परिणाम बुधवारी शेअर बाजारात अनिल अंबानींच्या शेअर्सवर दिसून आला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे दोन्ही शेअर्स अप्पर सर्किटमध्ये आले आहेत.

एका वर्षात 53 टक्के परतावा

परिणामी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 5 टक्क्यांच्या उसळीनंतर वरच्या सर्किटमध्ये दाखल झाला आहे. अर्थात हा शेअर 12.70 रुपये किंवा 5 टक्के उडी घेऊन, 267.25 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स 1.92 रुपये किंवा 5 टक्क्यांच्या वाढीसह 40.35 रुपयांवर व्यवहार करत आहेत. अलीकडच्या काळात रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. या समभागाने 2024 मध्ये 28 टक्के, एका वर्षात 53 टक्के, 2 वर्षात 92 टक्के आणि 5 वर्षात 900 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. रिलायन्स पॉवरच्या समभागांनी 2024 मध्ये 73 टक्के, एका वर्षात 140 टक्के आणि 5 वर्षांत 1100 टक्के परतावा दिला आहे.

हे देखील वाचा – छोट्या शहरातील तरुणाने उभारली तब्बल 750 कोटींची कंपनी; जगभरात आहे त्याच्या कंपनीचा डंका!

कंपनीकडे केवळ 475 कोटी रुपयांचे कर्ज थकीत

अलीकडच्या काळात अनिल अंबानी यांच्याशी संबंधित दोन्ही कंपन्या चर्चेत आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये रिलायन्स पॉवरने सांगितले होते की, कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. रिलायन्स पॉवरने विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचे ​​हमीदार म्हणून 3872.04 कोटी रुपयांच्या थकित कर्जाची परतफेड केली होती. त्यामुळे रिलायन्स इन्फ्राने 3831 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करताना सांगितले होते की, आता कंपनीकडे केवळ 475 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.

कंपनी स्फोटके, दारुगोळा, लहान शस्त्रे बनवणार

2 ऑक्टोबर 2024 रोजी रिलायन्स समूहाने घोषणा केली आहे की, कंपनी भूतानमध्ये 1270 मेगावॅट वीज निर्मितीसाठी सौर आणि जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. रिलायन्स ग्रुपने भूतानमधील स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी रिलायन्स एंटरप्रायझेस नावाने एक नवीन कंपनी देखील स्थापन केली आहे.

आता अनिल अंबानींच्या कंपनीने 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे स्फोटके, दारुगोळा आणि लहान शस्त्रे तयार करण्यासाठी एक मोठा एकात्मिक प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर गुंतवणुकदारांनी समूहाच्या दोन्ही सूचीबद्ध समभागांवर उड्या घेतल्या आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Anil ambani stocks shares of anil ambani reliance infrastructure reliance power surge by 5 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 04:15 PM

Topics:  

  • anil ambani
  • Reliance Infrastructure
  • Reliance Power

संबंधित बातम्या

संकटकाळात Anil Ambani ला दिलासा! 11 वर्ष जुन्या वादात विजय; खात्यात जमा होणार रू 28481 कोटी, शेअर्स चढणार
1

संकटकाळात Anil Ambani ला दिलासा! 11 वर्ष जुन्या वादात विजय; खात्यात जमा होणार रू 28481 कोटी, शेअर्स चढणार

अनिल अंबानी पोहोचले ईडी कार्यालयात, १७,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आज चौकशी
2

अनिल अंबानी पोहोचले ईडी कार्यालयात, १७,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आज चौकशी

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; कर्ज घोटाळ्याप्रकरणी आता बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरु, शेअर्स कोसळले
3

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; कर्ज घोटाळ्याप्रकरणी आता बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरु, शेअर्स कोसळले

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ३००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्यात ईडीने केली पहिली अटक, चौकशीसाठी समन्स जारी
4

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ३००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्यात ईडीने केली पहिली अटक, चौकशीसाठी समन्स जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.