छोट्या शहरातील तरुणाने उभारली तब्बल 750 कोटींची कंपनी; जगभरात आहे त्याच्या कंपनीचा डंका!
राज्यासह देसभरात सध्या तरुण मोठ्या प्रमाणात तरुण उद्योगधंद्यांमध्ये आपले नशीब आजमावत आहे. विशेष म्हणजे ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर तरुणांना उद्योगधंद्यांमध्ये मोठे देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने एक वेगळा मार्ग निवडत स्वतला सिद्ध केले आहे. त्याने कंम्पुटरबाबतच्या असलेल्या आवडीतून बॉबल एआय ही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी स्थापन केली आहे. त्याने या कंपनीच्या माध्यमातून जगभरातील १० हजार कोटींपेक्षा अधिक मोबाईल वापरकर्त्यांना आपली सेवा पुरवली आहे. ज्याद्वारे त्याच्या या कंपनीने २०२३ या साली वार्षिक ७५० कोटींचा महसुल कमावला आहे.
बॉबल एआय कंपनीची स्थापना
अंकित प्रसाद असे या तरुणाचे नाव असून, तो झारखंड या मागासलेल्या राज्यातील चाईबासा या छोट्याशा शहरातील रहिवासी आहे. २०१२ साली त्याने आयआयटी मुंबई येथून शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्याने 2015 साली मोठा भाऊ राहुल प्रसाद यांच्यासोबत मिळून बॉबल एआय या कंपनीची स्थापन केली. ही कंपनी एक नाविन्यपूर्ण एआय कीबोर्ड प्लॅटफॉर्म आहे. जिचे 10 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. 2023 मध्ये या कंपनीचा महसूल 750 कोटी रुपये इतका होता. त्यामुळे एका छोट्याशा शहरातून असलेल्या मुलाने बलाढ्य कंपनीच्या यशाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हे देखील वाचा – 2024-25 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहणार; आयएमएफचा सुधारित अंदाज जारी!
जगभरात आहे कंपनीचा डंका
बॉबल एआय या कंपनीने ‘बॉबल इंडिक’ की-बोर्ड तयार केला आहे. जो जगभरात बोलल्या जाणाऱ्या सुमारे 120 भाषांव्यतिरिक्त 37 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. अंकितचे वडील रणजित प्रसाद एनआयटी जमशेदपूर येथे प्राध्यापक होते. अंकितला लहानपणापासूनच कॉम्प्युटरची आवड होती. 1995 मध्ये त्याला त्याच्या वडिलांनी संगणक भेट दिला होता. अंकितने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी प्रोग्रामिंगमध्ये रस दाखवायला सुरुवात केली. 2005 मध्ये अंकित आणि त्याच्या भावाने मिळून एक छोटा वेब डिझाईन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला तो हॉटेल, सेवा व्यवसाय आणि रेस्टॉरंटसाठी वेबसाइट तयार करत असे. हळूहळू त्याचा व्यवसाय सुरू झाला आणि त्याला उत्पन्न मिळू लागले.
मोठ्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
अंकितचा 2018 मध्ये फोर्ब्स 30 अंडर 30 आशिया यादीत समावेश करण्यात आला होता. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे खूप कौतुक झाले आहे. अंकित हा केवळ तंत्रज्ञान तज्ञच नाही. तर बॉबल एआयमध्ये एक आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करणारा व्यक्ती देखील आहे. उत्तम कंपनी संस्कृती वाढवण्याच्या त्याच्या आवडीने बॉबल एआयला Android आणि Apple वर सर्वोच्च-रेट केलेले कीबोर्ड ॲप बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या बाबतीत बॉबल एआयने मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे.
मानाच्या पुरस्काराने आहे सन्मानित
अथक परिश्रम, जोखीम घेण्याची तयारी तसेच त्याच्या ध्येयांप्रती असलेले समर्पण यामुळे अंकितला अनेक अद्भुत यश मिळवण्यात मदत झाली आहे. अलीकडेच त्याला द इकॉनॉमिक टाइम्स इनोव्हेटिव्ह आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर (२०२४) हा पुरस्कार मिळाला आहे. त्याचा प्रभाव केवळ तंत्रज्ञान जगतापुरता मर्यादित नाही तर त्यांनी TEDx युवा वक्ता म्हणून लोकांना त्याने प्रेरित केले आहे.