ॲपल कंपनीला या एआय कंपनीने टाकले मागे, बनलीये जगातील सर्वात मोठी कंपनी!
तुम्हांला कोणी विचारले की जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती तर आयफोन बनविणारी ॲपल कंपनी असे उत्तर तुम्ही सहजपणे देऊन मोकळे होतात. मात्र, आता तुम्हाला असे कोणी विचारले की, जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती तर आयफोन बनविणारी एप्पल कंपनी असे उत्तर देऊ नका? कारण या जागी आता नवीन कंपनीने जागा घेतली आहे.
एनवीडिया ही कंपनी आता जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कारण या कंपनीचे बाजारातील मूल्य सर्वाधिक बनले आहे. एनवीडिया ही कंपनी देखील अमेरिकन आहे. त्यामुळे जागतिक कंपन्यांमध्ये अमेरिकेचा दबदबा कायम आहे.
हे देखील वाचा – बीएसएनएलकडून मिळाली मोठी ऑर्डर, या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडलेत!
कशी झाली सर्वात मोठी कंपनी?
कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे आर्टीफिशियल इंटेलिजन्स (एआय) सेक्टरमध्ये काम करणारी ही कंपनी आहे. मंगळवारी (ता.५) ॲपल कंपनीला पछाडत एनवीडीया जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. कारण या कंपनीचे बाजारमुल्य सर्वात जास्त बनले आहे.
आर्टीफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एनवीडिया कंपनीच्या शेअरच्या भावात 2.9 टक्के वाढ झालेली आहे. यामुळे या कंपनीचे बाजारमुल्य (मार्केट कॅप) 3.43 लाख कोटी डॉलर इतके झालेले आहे. ही रक्कम भारताच्या अर्थव्यवस्थे एवढी आहे. तर एप्पल कंपनीचे बाजार मूल्य 3.38 लाख कोटी डॉलर झाले असून ते एनवीडीया पेक्षा कमी झाले आहे.
जूनमध्येही मिळवला होता बहूमान
या आधी एनव्हीडिया कंपनीने मायक्रोसॉफ्ट कंपनीला मागे टाकले होते. मायक्रोसॉफ्टचा मार्केट कॅप ( बाजारमुल्य ) 3.06 लाख कोटी डॉलर आहे. या बाब म्हणजे एनव्हीडीया कंपनीच्या शेअऱमध्ये साल 2022 अखेरपासून आतापर्यंत 850 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. सध्या एस&पी 500 इंडेक्स (एक प्रमुख शेअर निर्देशांक) मध्ये एनवीडीयाचा 7 टक्क हिस्सा आहे. आणि या निर्देशांकाच्या 21 टक्के वार्षिक वाढीतील एक चतुर्थांश हिस्सा एनवीडीयामुळे आहे. जूनमध्येही एनवीडीयाने सर्वात मोठी कंपनीचा मान मिळविला होता. परंतू तो केवळ एक दिवसासाठी होता.
दरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) क्षेत्रामध्ये माइक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मागे असूनही, गेली काही दिवसांमध्ये ॲपलच्या कामगिरीमध्ये मोठी सुधारणा दिसून आली होती. जुनच्या मध्यावधीत ॲपल कंपनीने माइक्रोसॉफ्ट कंपनीला मागे टाकून, पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी व्हॅल्युएबल कंपनी बनण्याचा बहूमान मिळवला होता. त्यानंतर आता एनवीडिया कंपनीने ॲपल कंपनीला मागे टाकत हा बहूमान आपल्या नावे केला आहे.